Join Whatsapp

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचे राष्ट्रपतीना तहसीलदार हिंगणघाट मार्फत निवेदन

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क: दिनांक ३०: बांगलादेशात तख्तापलट झाल्यानंतर हिंदूवर सतत अत्याचार होत आहेत. हिंदूंची मंदिरे उध्वस्त करण्यात येत आहेत, घरांची जाळपोळ असे प्रकारचे अनेकानेक अन्याय अत्याचार होत आहेत. त्यातल्या त्यात कहर म्हणजे हिंदूंचा पक्ष घेऊन त्यांच्यासाठी न्याय मागणारे इस्कानचे चिन्मय दास प्रभू यांना अटक करण्यात आली.

त्यांना जामीन सुध्दा नाकारण्यात आला. या सगळ्या प्रकरणात भारताने लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याकरिता तहसीलदार हिंगणघाट यांना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी विश्व हिंदू परिषद वर्धा जिल्हा सहमंत्री शरद कोणप्रतीवार,विहिंप प्रखंड उपाध्यक्ष संजय भोंग, विश्व हिंदू परिषद हिंगणघाट प्रखंड मंत्री सचिन धारकर ,सहमंत्री अजय भोंग,बजरंग दल सयोंजक दिपक शर्मा ,हिंगणघाट नगर अध्यक्ष गजानन मसाये,शुभम जैस्वाल,देवा वाघमारे रोशन चंदनखेडे, संदिप मोटवानी, महेश रघटाटे, राहूल बावने, सुशेन राय ,वासूदेव त्रिवेदी, मुन्ना त्रिवेदी, मनिष शेंडे.

अंकीत त्रिवेदी,निहाल गंडाईत, सागर चांगलानी, स्नेहल डफ, जितेंद्र पाठक, प्रणय आठवले, वैभव मेंडे, रवी उदासी, युवराज माऊसकर, विवेक आहुजा ,बबलू खेनवाल आणि विहिंप बजरंग दल चे शेकडो कार्यकर्ते निवेदन देतेसमयी उपस्थित होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!