Join WhatsApp group

Ads

अधिवक्ता कमल एच. आनंदानी यांचा खटल्याला सुयश – कथित छेडछाड प्रकरणी ८ महिन्यांपासून कारागृहात असलेल्या आरोपीस उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन

By Sarkarmzanews

February 10, 2026 5:28 pm

Ads

अकोला | प्रतिनिधी | दिनांक १० |

खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत कथित छेडछाड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नयागाव येथील ऑटोचालकास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. संबंधित आरोपी गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होता.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी ऑटोचालकाने विद्यार्थिनीस तिच्या ठरलेल्या ठिकाणी न सोडता कथितरित्या दुसऱ्या ठिकाणी नेले व तिच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने चालत्या ऑटोतून उडी मारत थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत नयागाव येथील जफर खान सुबेदार खान यास अटक केली होती.

या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. दरम्यान, आरोपीने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर आरोपीने अधिवक्ता कमल एच. आनंदानीएम.बी. शर्मा यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला.

या अर्जावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीस २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. तसेच आरोपीने कोणत्याही साक्षीदारावर दबाव आणू नये, प्रत्येक तारखेला न्यायालयात उपस्थित राहावे, अनुपस्थित राहिल्यास जामीन रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय आरोपीने आपला कायमचा पत्ता व मोबाईल क्रमांक तपास अधिकाऱ्यांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!