Join WhatsApp group

“निवडणुकीचा तपता माहोल: मुर्तिजापूरमध्ये चर्चेत जात, गायब विकास”

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर: नगर परिषद निवडणूकचे वातावरण चढत असताना सामान्य नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा जातीय समिकरण बनला आहे.

कोणत्या समाजाचे किती मत, कोणत्या उमेदवाराला कोणत्या जातीतून किती पाठबळ, कोण कोणाला पाडणार आणि अखेर कोण निवडून येणार — या चर्चांनी शहरभर राजकीय तापमान वाढवले आहे.

परंतु या सर्व गदारोळात विकास, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था यांसारखे मूळ मुद्दे सामान्य जनतेच्या चर्चेतून जवळजवळ गायब झाले आहेत.

शहराच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नांना दुय्यम स्थान देत मतदार पुन्हा एकदा जात-समाजाच्या गणितात अडकत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

🔴 जातीयतेच्या आधारावर मतदान — विकासाला धोका

गेल्या अनेक निवडणुकांचा इतिहास सांगतो की जातीयतेवर झालेल्या मतदानातून कधीही दीर्घकालीन विकास साधला जात नाही. निवडून आलेल्या प्रतिनिध्यांनी जातीनिहाय अपेक्षा सांभाळण्याच्या ओझ्याखाली शहराच्या समग्र विकासाकडे दुर्लक्ष केलेली उदाहरणे असंख्य आहेत.या वेळीही त्याच पद्धतीची पुनरावृत्ती होण्याची भीती नागरी समाज व्यक्त करत आहे.

🔴 झोपलेल्या मतदारांना जागृत करण्याची गरज

सामान्य जनता रस्ते, नाले, पाण्याची समस्या, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट, शहरी आरोग्य व शैक्षणिक सुविधा यांसाठी दररोज संघर्ष करते—पण मतदानाच्या वेळी मुद्दे जातीच्या गणितात कुठेतरी हरवून जातात. म्हणूनच सामाजिक कार्यकर्ते, बुद्धिजीवी व जाणकार नागरिक झोपलेल्या मतदारांना कोणीच जागे न करण्याचे आवाहन आज शहरात उभे आहे.

“मत विकासाला की समाजाला?”

🔴 या निवडणुकीतही काय पुन्हा त्याच पद्धतीने?

संपूर्ण मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीत यावेळीही जातीय समिकरण महत्त्वाचे ठरणार, असे चित्र आहे. उमेदवार सुद्धा जातीच्या मतदार संख्येवर रणनीती आखताना दिसत आहेत.

परंतु जनता जर खरोखर बदल पाहू इच्छित असेल, तर प्राथमिकता बदलणे गरजेचे आहे.

या निवडणुकीत निर्णय नागरिकांचा आहे—जातीय राजकारणाला साथ देणार की शहराच्या विकासाला दिशा देणारा मार्ग निवडणार?

हाच प्रश्न मुर्तिजापूरच्या प्रत्येक जागरूक मतदारा समोर आज ठाम उभा आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!