Join WhatsApp group

आमदार हरीश पिंपळे ला खरच उमेदवारी साठी विरोध आहे का ?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – २० ऑक्टो.२४ – मुर्तीजापुर – गेल्या काही दिवसान पासून आमदार हरीश पिंपळे यांचा विरोधात मतदार संघात विरोधाचे सुर ऐकण्यास भेटत आहे. काही आजी माजी कार्यकर्ते मिटिंग करून हरीश पिंपळे यांना उमेदवारी न मिळावी याचा साठी वरिष्ट स्तरावर पत्र व्यवहार करत आहे. तसेच त्यांचा विरोधात घोषणाबाजी करत आहे. हे सगळ होत असतांना स्थानिक भाजप मध्ये खळबळ उडाली आहे.

एक त्या मिटिंग मधला कार्यकर्ता प्रसार माध्यमांवर पहिल्या दिवशी विरोधात बोलतो तर दुसर्या दिवशी भाऊ चा बाजूने बोलतो हे काय सुरु आहे ? हे समजणे थोडे कठीण झाले आहे, तसेच जनते मध्ये चर्चा आहे कि तो कार्यकर्ता गरीब असल्यामुळे त्याला धमकावण्यात आले असून त्यावर दबाव टाकण्यात आला तर घाबरून त्याने दुसर्या दिवशी आपले भाऊ विरुद्ध सुर बदलले. हे सगळ प्रकरण किती खर आणि किती खोटे हे कुणास ठावूक पण मात्र या प्रकरण पासून हरीश पिंपळे यांना आपल्या उमेदवारी वर फरक पडणार का ? हे पाहणे आता रोचक ठरले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!