मूर्तिजापूर-प्रतिभावंत नगर येथील ज्ञान-नर्मदा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक विष्णू लोडम तथा हॅपी वुमन्स क्लबच्या अध्यक्षा सुनीता लोडम यांच्या पुढाकारातून प्रा.अमिता तिडके डॉ.स्वाती पोटे यांच्या मार्गदर्शनात हॅपी वूमन्सच्या सदस्या यांच्या उपस्थितीत वर्षभर संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती उत्सव जागतिक महिला दिन वृक्षारोपण आरोग्य शिबिर स्वच्छता अभियान विद्यार्थ्यांचे गुणगौरव जेष्ठ नागरिक तथा कर्तुत्वान महिलांचा सत्कार असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केले जातात.

संस्थेद्वारा संचालित हॅपी वुमन्स च्या पुढाकारातून गेल्या दहा वर्षापासून नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिवाळी धनतेरस च्या शुभ मुहूर्तावर सिरसो गायरान येथील कुष्ठरोगी दिव्यांग गरीब गरजू लोकांना दिवाळी फराळ वाटप करून खरी दिवाळी साजरी केली हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुनीता लोडम प्रा.अमिता तिडके डॉ. स्वाती पोटे रूपाली तिडके वनिता पाथरे कल्पना तिडके डॉ. समृद्धी तिडके निकिता सावळे रजनी भिंगारे माया दवंडे प्रीती जयस्वाल प्रगती देवके समाजसेविका वैजयंताताई डोंगरदिवे रंजना सदार दिपाली देशमुख कु. इशाली देवके कु.माऊली भिंगारे यांनी परिश्रम घेतले संस्थेच्या वतीने सुनिता लोडम यांनी सर्वांचे आभार मानले.
