Join WhatsApp group

अकोल्यात शांतता राखण्यासाठी पालकमंत्र्यांचे पोलिस प्रशासनाला सर्तक राहण्याचे आदेश

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सर्तक राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अकोला शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांबाबत तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खास खबरदारी घेण्याची मागणी खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी केली होती.

गणेशोत्सव, कावड यात्रा, मोहरम, ऋषिपंचमी चातुर्मास अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने योग्य नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. अकोट, बार्शीटाकळी, अकोला आणि मूर्तिजापूर येथे मोठ्या प्रमाणावर कावड यात्रा काढली जाते. या पार्श्वभूमीवर भाजपचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे क्षेत्रीय पाहणी केली असून आवश्यक त्या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.

खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी याआधीच लेखी स्वरूपात प्रशासनाला योग्य नियोजन करण्याबाबत सूचित केले होते. त्या अनुषंगाने प्रशासनाने निरीक्षणेही केली असून आता पालकमंत्र्यांनी कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचा आदेश दिला आहे.

शिवभक्त, गणेशभक्त, मुस्लिम समाजासाठी मोहरम, तसेच जैन समाजासाठी ऋषिपंचमी चातुर्मास यासारख्या विविध धार्मिक परंपरांचा सन्मान राखत त्यांना आवश्यक सुविधा आणि सुरक्षिततेची हमी प्रशासनाने द्यावी, असेही अ‍ॅड. फुंडकर यांनी स्पष्टपणे सांगितले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!