Join WhatsApp group

ग्रामपंचायत हातगावमध्ये मारहाण व जीवे धमकी प्रकरण — सरपंचावर गुन्हा दाखल, राजकीय षडयंत्राचा आरोप

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर – हातगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून झालेल्या वादातून मारहाण व जीवे धमकी दिल्याचा प्रकार घडला असून, याप्रकरणी सरपंच अक्षय जितेंद्र राउत यांच्याविरुद्ध मुर्तीजापुर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 08 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता ग्रामपंचायत हातगाव येथे चौकशी सुरू असताना, फिर्यादी शिवदास मधुकर राउत (वय 45, रा. हातगाव) यांनी आरोपी व सरपंच अक्षय जितेंद्र राउत यांच्या विरोधात गट विकास अधिकारी व मुख्य सहाय्यक अधिकारी यांच्याकडे भ्रष्टाचाराबाबत लेखी तक्रार दिली होती.

या तक्रारीवरून संतप्त झालेल्या आरोपीने चौकशीदरम्यान फिर्यादीस “तु माझ्या विरुद्ध तक्रार का केली” असे विचारत अश्लील शिवीगाळ करून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी कलम 296, 351(2), 352, 115(2) भारतीय न्याय संहिता तसेच कलम 92 दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास सुरू आहे.

दरम्यान, सरपंच अक्षय राउत यांनी सरकार माझा न्युजशी प्रतिक्रिया देताना म्हटले की,“हे प्रकरण हे काही वेगळे नसून माझी राजकीय बदनामी करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. आम्हाला काम करू न देण्यासाठी असे प्रकार घडवून आणले जात आहेत.

तसेच, त्यांनी स्वतःकडून व्हाट्सअप वर प्रेस नोटच्या माध्यमातून पुढे स्पष्ट केले की —“मी, अक्षय जितेंद्र राउत, जनतेच्या आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, शिवा राउत या व्यक्तीस मी अंदाजे 2 वर्षांपूर्वी रु. 50,000/- इतकी रक्कम वैयक्तिक मदतीसाठी दिली होती.

सदर रक्कम परत मागितल्यावर, शिवा राउत याने जाणूनबुजून माझ्याशी वाद घातला आणि मला अडचणीत आणण्यासाठी खोटा रिपोर्ट/तक्रार दाखल केली.

ही बाब माझ्या चारित्र्याला आणि प्रतिष्ठेला ठेस पोहोचवणारी आहे. सदर व्यवहाराबाबत मी दिलेल्या पैशांची ऑडिओ रेकॉर्डिंग आणि अन्य ठोस पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत, जे वेळ पडल्यास तपास यंत्रणेला सादर करण्यात येतील.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून माझ्यावर लावलेले खोटे आरोप फेटाळावेत आणि शिवा राउत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.”


Share

Leave a Comment

error: Content is protected !!