Join WhatsApp group

दोन कुख्यात चोरांकडून लाखो रुपयांचा माल जप्त!पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडून तपास पथकाला २५,००० रुपयांचे बक्षीस

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : खदाण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस वाढणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे पोलिस यंत्रणा हादरली होती. मात्र, अखेर डीबी पथकाच्या सतर्कतेमुळे दोन कुख्यात चोरांना ताब्यात घेण्यात यश आले असून त्यांनी ११ घरफोड्या आणि एक दरोडा केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईतून १४ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाईची रूपरेषा :२४ जून रोजी केशनगर येथील रहिवासी यज्ञेश मोहन जोशी यांच्या घरात ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार खांडण पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. यावरून तपास सुरू झाला. डीबी शाखेतील कर्मचारी नीलेश खंदारे आणि अमित दुबे यांनी त्यांच्या खबऱ्यांद्वारे माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.

एक खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डाबकी रोड, भागवत वाडी येथील शेख अहमद उर्फ आरिफ (४६) आणि कामगार कॉलनीतील तेजस खोब्रागडे (३२) या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी आधी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण ठोस पुराव्यांपुढे नमते घेत ११ घरफोड्या आणि एक दरोडा केल्याची कबुली दिली.

जप्त मुद्देमाल – एकूण किंमत ₹१४,३२,५०० :

सोने (११३ ग्रॅम) – ₹१०,१७,०००

चांदी (२ किलो ९१० ग्रॅम) – ₹२,६१,०००२

दुचाकी वाहने – ₹१,५०,०००

इतर साहित्य – ₹५००

तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी :

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली. तपास पथकात डीबी कर्मचारी नीलेश खंदारे, अमित दुबे, अभिमन्यू सदाशिव, वैभव कस्तुरे यांचा सहभाग होता. अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि एसडीपीओ सतीश कुलकर्णी यांनीही कारवाईस मार्गदर्शन केले.

तपास पथकाला गौरव – २५,००० रुपयांचे बक्षीस :खदान पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तपास पथकाच्या कार्याची प्रशंसा करत २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

अमरावती जिल्ह्यातही गुन्हे दाखल :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही आरोपींविरुद्ध अकोला व्यतिरिक्त अमरावतीमध्येही अनेक गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांच्या दक्षतेमुळे एक मोठी चोरीची साखळी उघडकीस आली असून, परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुढील तपासात आणखी गुन्हे समोर येण्याची शक्यता असून, ही कारवाई पोलिसांसाठी मोठे यश ठरली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!