Join WhatsApp group

मुर्तिजापूरात ‘घर घर तिरंगा’ उपक्रम उत्साहात

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अकोला लोकसभा खासदार अनुप सं. धोत्रे, अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर तसेच मुर्तिजापूरचे आमदार हरीष पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली घर घर तिरंगा – हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्याचा ७८ वा अमृत महोत्सव १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान साजरा करण्यात येत आहे.

या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, मुर्तिजापूर शहर आणि अमित नागवान मित्र परिवार यांच्या वतीने शहराध्यक्ष हर्षल साबळे, माजी नगराध्यक्ष मोनालीताई गावंडे, माजी यु.मो. जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, तालुकाध्यक्ष नंदकिशोर राऊत, यु.मो. तालुकाध्यक्ष राम कांबे, यु.मो. शहराध्यक्ष राहुल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय ध्वजाचे महत्त्व युवकांना समजावून सांगण्यात आले तसेच ध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमात मोठ्या संख्येने युवा मंडळी, बूथप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम् व भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!