Join WhatsApp group

हदपार आरोपी सनी दुबे वैशाली बारमध्ये सापडला; मुर्तीजापुर शहर पोलिसांची कारवाई

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (23 जुलै 2025) –महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 142 अन्वये एक वर्षासाठी अकोला जिल्ह्यातून हदपार करण्यात आलेला सनी विजय दुबे (वय 24, रा. स्टेशन विभाग, मूर्तिजापूर) हा मंगळवारच्या मध्यरात्री हॉटेल वैशाली बार येथे सापडल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक आशिष अशोकराव शिंदे (पो. स्टे. मूर्तिजापूर शहर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विभागीय गस्त दरम्यान गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की हदपार आरोपी वैशाली बारवर बसलेला आहे.

सदर माहितीच्या आधारे पीएसआय शिंदे व पीसी साहिल मुलाणी यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस ताब्यात घेतले.

पंचासमक्ष आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे Apple कंपनीचा iPhone 16 (IMEI क्रमांक 358964587144887) व त्यात Airtel कंपनीचे सिम असल्याचे आढळून आले. सदर मोबाईलची किंमत अंदाजे 50,000 रुपये असून, तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.

सनी दुबे याला अकोला जिल्ह्यात प्रवेश करण्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी नसताना तो मूर्तिजापुरमध्ये वावरत असल्यामुळे, त्याच्याविरुद्ध कलम 142 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!