Join WhatsApp group

धकाधकीतून विरंगुळ्याकडे… रोमँटिक लाईव्ह आर्केस्ट्रा शहरवासीयांसाठी मोफत

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर (प्रतिनिधी) :धकाधकीच्या जीवनात विरंगुळा आणि मन:शांती मिळावी यासाठी नागरिकांसाठी एक आगळावेगळा संगीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

रविवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता राधा मंगलम, तिडके नगर, मुर्तीजापूर येथे “दिल से मिले दिल” लाईव्ह रोमँटिक साँग आर्केस्ट्रा होणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी निशुल्क खुला आहे.

हा खास संगीत कार्यक्रम शहरातील संगीतप्रेमींसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे. ताणतणावाच्या जीवनशैलीतून काही क्षण आनंदाने व्यतीत व्हावेत आणि नागरिकांना मनोरंजनाची पर्वणी लाभावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला वर्गासाठी स्वतंत्र विशेष व्यवस्था आयोजक मंडळाकडून करण्यात आली आहे.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन समाजसेवक रितेश शर्मा (पिंकू), ज्ञानेश टाले सर, विष्णू लोडम, गजानन वर्घट, सुरज तिवारी, जितू चौबे, इम्रान भाई, इस्माईल भाई घडीवाले, रवी गोंडकर तसेच सर्व मित्र परिवार मुर्तीजापूर यांच्या वतीने करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.—

👉 कार्यक्रम तपशील :📅 दिनांक : रविवार, २४ ऑगस्ट २०२५🕠 वेळ : सायंकाळी ६:३० वाजता📍 स्थळ : राधा मंगलम, तिडके नगर, मुर्तीजापूर


Share

Leave a Comment

error: Content is protected !!