Join WhatsApp group

स्वत:च्या केलेले पाप लपविण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांचे अपमान केला जात आहे: एड देशमुख

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २६ जून २५ : अकोला : लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनसंघ यांनी काँग्रेस विरोधी पार्टी सोबत आणीबाणी आपातकालीन लोकशाही हत्याच्या विरोधात संघर्ष केला.

परमपूज्य तृतीय संघचालक बाळासाहेब देवरस यांची महत्त्वाची भूमिका होती परंतु संजय राऊत आणि काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आपलं पाप लपवण्यासाठी लोकशाही स्वातंत्र्यसेनानींचा अपमान करण्याचा प्रकार करत असून अनेक वेदना त्रास सहन करून परिवाराने त्या काळामध्ये बहिष्कृत होऊन आपलं जीवन कठीण जगले.

वृत्तपत्रापासून तर राजकीय क्षेत्रापर्यंत न्यायालयापासून तर सर्व पर्यंत बंदी आणणारे मतदानाचा हक्क नसताना पंतप्रधानपदी राहणारे लोकशाहीचे सगळे संकेत नष्ट करणाऱ्या काँग्रेस आणि त्यांना सहकार्य करणारे राऊत सारखे नेते परमपूज्य संघचालक बाळासाहेब देवरस यांची बरोबरी करू शकत नाही असे प्रतिपादन व लोकशाही स्वातंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष एडवोकेट विजयराव देशमुख यांनी केले.

भारतीय जनता पार्टी अकोल्याच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून संजय भाऊ धोत्रे स्वर्गीय गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, तेजराव थोरात किशोर पाटील विजय अग्रवाल जयंत मसने यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या विचारसरणीचे परंतु लोकशाही बचावासाठी लोकशाही हत्या करणाऱ्यांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.

मंचावर संतोष शिवरकर, विजय अग्रवाल जयंत मसने , वसंत बाछुका,गिरीश जोशी, जयप्रकाश पांडे, माधव मानकर, सिद्धेश्वर देशमुख, देवाशिष काकड, रमेश अलकरी स्वातंत्र्यसैनिक मुंजे काका अंबादास उमाळे, पवन माहेश्वरी, संजय जोशी, अभिजीत, परांजपे, केशव हेडा, पुरुषोत्तम खोत नथू शेळके, मोहन पारधी नितीन लांडे किशोर कुचके, शिवा , हिंगणेआदी विराजमान होते .

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात देशभरात त्रास झाला परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंसेवकांच्या संघर्षाला व त्यांच्या इच्छापूर्ती करून समाज निर्माण करण्याचं काम केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय संघाच्या विचारांना प्रचार प्रसार करणे आपल्या माध्यमातून कार्य करणे यासाठी लोकशाहीसाठी अनेक त्रास परिवाराच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा सौभाग्य मिळाला नाही.

तरी कठीण प्रसंगांमध्ये कार्य केला आणि आता त्यांच्या विचारांना प्रेरणा मिळत आहे इच्छा आकांक्षा पूर्ण होत आहे हे स्वर्ण अक्षराने लिहिण्यासारखे आहे दुःख नंतर सुख येथे हे सत्य असल्याचे जयप्रकाश पांडे यांनी अनेक उदाहरणे सांगून तरुण भारताच्या शताब्दी वर्ष संघाची शताब्दी वर्ष व स्वयंसेवक व लोकशाही स्वातंत्र्य सेनानी यांचा पुत्र महाराष्ट्राच्या गादीवर बसून मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असून समाजातील 14 कोटी जनतेचा कल्याणाचे काम करत आहे.

हे आमच्या सौभाग्याची गोष्ट असल्याची एडवोकेट विजयराव देशमुख यांनी याप्रसंगी सांगितले.यावेळी विजय अग्रवाल यांनी देशभरातील लोकशाही बचाव व लोकशाही हत्यांच्या संग्रामामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांचा सन्मान करण्याची प्रक्रिया व त्यांची प्रेरणा घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा, बिहार गुजरात या राज्यामध्ये सुरू आहे. पूर्वजांना आठवण ठेवण्याची संस्कृती सनातन धर्मामध्येच असून केवळ सनातन धर्म हा प्रत्येकाचा कल्याणाची भावना करणारा असल्याचे सांगून लोकशाहीची हत्या करणारे आज लोकशाही धोक्यात आहे असे सांगतात आणि एकीकडे पंतप्रधानांना खालच्या स्तरावर टीका करतात हे कशाचे द्योतक आहे असा सवाल करून लोकशाही खरी ही नरेंद्र मोदी यांच्या काळात सुरू असून संविधान दिवस तसेच घटना शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरणा देणारा लोकशाही सभागृहाला नमन करणारा पंतप्रधान ओबीसी समाजाचा पंतप्रधान सहन होत नाही.

त्यामुळे खालच्या स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व टीका करतात तरी खुले आम फिरतात आणि समाजामध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशा तत्वापासून सावध राहण्याची गरज असल्याची भाजपा नेते विजय अग्रवाल यांनी आपल्या जोश पूर्ण भाषणात सांगितले तर यावेळी भाजपा कोषाध्यक्ष वसंत बाछु का यांनी आपल्या लग्नातील प्रसंग सांगून आपल्या सासर्याला व परिवाराला मलकापूर येथे मख्खललाल अग्रवाल परिवाराला अटक झाली आणि आपलं लग्न साध्या पद्धतीने झालं त्यामुळे हे परिवार जेलमध्ये असताना पोरीचं लग्न पाहू शकणार नाही तरी विचाराने एक संघ राहून त्यासाठी त्याग करणारे नातेवाईकांची निधन झाले.

तरी जेलमध्ये राहून शोकवेदनात करणारे परिवारांच्या ताकदीवर त्यांच्या संघर्षामुळे आज भारतीय जनता पक्षाला चांगले दिवस आल्याचे त्यांनी सांगितले यावेळी जयंत ,मसणे, स्वातंत्र्य सेनानी परिवारांचे मनोगत व त्यांनी केलेले कष्ट याविषयी मत मांडण्यात आले आरंभी भारतमाता जयप्रकाश नारायण, पंडित दीनदयाल उपाध्याय शामाप्रसाद मुखर्जी बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई होळकर ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा ज्येष्ठ आघाडीचे व लोकशाही संग्राम सेनानी संघाचे पदाधिकारी सिद्धेश्वर देशमुख यांनी केले. संचलन गिरीश जोशी तर आभार प्रदर्शन एडवोकेट देवाशिष काकड यांनी केले. यावेळी 61 लोकशाही बचाव साठी जेलमध्ये जाणाऱ्या परिवाराचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मधुकर येरेकर माया ताई श्रीवास देविदास मुळेकर दौलतराव गावंडे कमलाताई मानकर दिगंबर मसुद मधुकर बोडके बेबीताई खंडागळे उत्तमराव थोरात मधुकर तायडे ताडे मोहन गावंडे ललिता ताई नेमाडे विनोद देशमुख पुष्पाताई झटाले श्रीराम भगत सौरभ शहा उषा शहा गजानन पाठक कमलाताई राऊत विवेक जोशी शकून परांजपे दिनेश जोशी रामदास कोल्हे श्रीकांते देविदास शिंगारे देविदास शिंगारे अनिल ईटेलकर वेणूताई तायडे देवकाताई पुरी पद्माकर राव देशमुख वासुदेवराव मोरे निलेश जोशी चा सन्मान करण्यात आला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!