Join WhatsApp group

Ads

भारतीय सैन्यात नोकरी लावतो म्हणत 10 लाखांची फसवणूक – दिशा एज्युकेशन अ‍ॅकॅडमीचा संचालकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल

By Sarkarmzanews

June 12, 2025 9:34 am

Ads

दिनांक १२ जून २५ : मूर्तिजापूर : (डॉ. विनोद पुंडगे प्रतिनिधी) भारतीय सैन्यात भरदिशा एज्युकेशन अ‍ॅकॅडमीती करून देण्याचे आमिष दाखवत एकाला तब्बल 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना 10 जून रोजी समोर आली आहे.

याप्रकरणी दिशा एज्युकेशन अ‍ॅकॅडमीचे संचालक वैभव राऊत रा. मूर्तिजापूर आणि देवेंद्र अंबलकर रा. अकोट या दोघावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्राप्त माहितीनुसार फिर्यादी वैभव राजेंद्र मोरे (वय 28), रा. वाहाळा, ता. पातुर, जि. अकोलाहा युवक भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी तयारी करत होता.यातील दोनही आरोपींनी फिर्यादीस “कमीशन इन द टेरिटोरियल आर्मी” अंतर्गत भरती लावून देण्याचे आश्वासन दिले.

त्यांच्याकडून एक कोरा 100 रुपयाचा स्टॅम्प बँड, चेक घेतला आणि नोकरी लागल्यानंतर 10 लाख रुपये देण्याचा करार झाला.

पुढे फिर्यादीला “116 पायदळ पलटन” (PRAC. SE) चे बनावट जॉईनिंग लेटर, एक बनावट अॅडमिट कार्ड, आणि लेक कर्नल/कर्नलच्या बनावट सहीने कागदपत्र दिली गेली.

बनावट जॉईनिंग लेटर [email protected] या अज्ञात ईमेल आयडीवरून फिर्यादीच्या [email protected] वर पाठवण्यात आले होते.

फिर्यादीचे मूळ कागदपत्र घेऊन आर्मी जॉईन करण्यासाठी गेला असता, ते सर्व कागदपत्र बनावट असल्याचे समोर आले आणि आपली फसवणूक झाल्याचे त्याला लक्षात आले.

याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीसांनी कलम 318(4), 336(3), 340(2), 3, 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार शेख इरफान हे करीत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!