Join WhatsApp group

“पाच वर्ष काम शून्य… आता मत कशाच्या जोरावर? प्रभाग १, ९ व १२ मध्ये जुने नगरसेवक धोक्यात”

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक जशी जवळ येत आहे, तशी प्रभाग क्रमांक १, ९ आणि १२ मध्ये नाराजीची ज्वाला भडकू लागली आहे.

या तीनही प्रभागांमध्ये जुन्या नगरसेवकांविषयी नागरिकांचा रोष इतका तीव्र आहे की काही ठिकाणी मतदार थेट दारातूनच विरोधाची भूमिका घेताना दिसत आहेत.

गेल्या पाच वर्षांत निवडून आल्यानंतर “पाच मिनिटे”ही प्रभागासाठी न काढणारे हे काही माजी नगरसेवक प्रभागातील समस्या, रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, घाण या कोणत्याही विषयावर कधीही पुढे दिसले नाहीत.

अनेक प्रभागातील लोकांची स्पष्ट तक्रार —

“निवडून आल्यानंतर चेहरा दिसला नाही, आणि आता निवडणूक लागली तर मतांच्या मागे घरोगरी फिरत आहेत!”

या नाराजीला अधिक खतपाणी घालणारा मुद्दा म्हणजे—हेच माजी नगरसेवक आता सामाजिक नेते, स्थानिक मंडळे आणि गटातील काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करत आहेत.

काही ठिकाणी मतांची ‘सेटिंग’, समाजांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न, लोकांना दबावतंत्राने वळवण्याचे प्रकारही चर्चेत आहेत.पण यावेळी चित्र वेगळे आहे.

या तीन प्रभागातील नागरिक उघडपणे सांगत आहेत :“पुन्हा तेच चेहरे नको… ज्यांनी काम केले नाही, त्यांना मत नाही!”

प्रभाग १, ९ आणि १२ मधील जनतेची ही नाराजी, कधीही न पाहिलेला एक जागरूकतेचा टर्निंग पॉइंट ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, प्रभागात वेळ न देता, कॉन्ट्रॅक्टर्सच्या सावलीत काम करणाऱ्या, समस्या न ऐकणाऱ्या, एकाही मुद्द्यावर ठोस भूमिका न घेणाऱ्या नगरसेवकांना यावेळी दारापर्यंत थांबवण्याचा इशारा मतदारांनी दिला आहे.

यामुळे पक्षांतर्गत समीकरणे कोलमडली असून, वेगवेगळे गट नवीन, स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी हालचाली करताना दिसत आहेत.

जुन्या नगरसेवकांचा प्रोफाइल “लूज” असल्याने स्वतःच्याच पक्षात त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रभागांतील महिला, युवक, व्यावसायिक आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांचा एकच सूर—“नावाने नगरसेवक, पण कामाने शून्य!

यावेळी नवे चेहरे, नवे नेतृत्व, आणि खरे काम हवे.”प्रभाग क्रमांक १, ९ आणि १२ मधील ही तीव्र नाराजी आगामी निवडणुकीत परिणाम उलथवून टाकणारा निर्णायक घटक ठरू शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत असून शहरातही या घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!