Join WhatsApp group

मुर्तीजापूर तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि पिकांचे नुकसान कारणीभूत

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर: मुर्तीजापूर तालुक्यातील खरब ढोरे येथील शेतकरी राजेंद्र ज्ञानदेवराव ढोरे (वय अंदाजे ४५) यांनी सोमवारी सकाळी आठ वाजता आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सलग ढगफुटीसदृश्य पावसामुळे खोराड नदी-नाल्यातून आलेल्या पुरामुळे त्यांच्या शेतातील सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच बँकांचे प्रचंड कर्जाचा डोंगर वाढल्याने ते नैराश्येत होते.

शेतकरी ढोरे यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, “सरकारने निवडणुकीच्या वेळी सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. पण आजही हजारो शेतकरी कर्जबाजारीपणामुळे उध्वस्त झाले आहेत. यामुळे आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुर्तिजापूर येथे झालेल्या प्रचारसभेत “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू” असे आश्वासन दिले होते, मात्र आज ते आश्वासन हवेत विरले असून शेतकरी आत्महत्यांच्या रांगेत जात आहेत, असा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

जनतेची मागणी :

👉 राज्य शासनाने तातडीने कर्जमाफी जाहीर करावी

👉 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबवावे

👉 पीकनुकसानीचा योग्य पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी.

या दुर्दैवी घटनेमुळे ढोरे कुटुंब उघड्यावर आले असून, गावकऱ्यांनी शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी केली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!