Join WhatsApp group

ओसवाल कंपनीकडून शेतकऱ्याची फसवणूक, शेतकऱ्याची कृषी विभागाकडे तक्रार – तत्काळ कारवाई न झाल्यास शेतकऱ्याची उपोषणा वर बसण्याची तयारी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर (दिनांक ०२ जुलै २५):तालुक्यातील योगेश उर्फ धनंजय सोळंके शेतकऱ्याने ओसवाल बियाणे कंपनीवर गंभीर आरोप करत कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

संबंधित शेतकऱ्याने खरीप हंगामासाठी ओसवाल कंपनीचे बियाणे विकत घेतले होते. मात्र, वेळेवर पेरणी करूनही आठवड्याहून अधिक काळानंतरही बियाण्यांकडून कोंब फुटले नाहीत. परिणामी, मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.

शेतकऱ्याने कृषी विभागाला दिलेल्या लेखी तक्रारीत बोगस बियाण्यामुळे उत्पन्नाचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट केले असून, संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईसाठी पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर प्रकारामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. कृषी विभागाने वेळेत कारवाई न केल्यास ओसवाल कंपनी विरुद्ध व प्रशासन विरुद्ध उपोषणास बसण्याची तयारी या शेतकऱ्यांनी केली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!