Join WhatsApp group

खंडणीखोर बंटी आणि बबली अटकेत; व्यापाऱ्याकडून तब्बल १८ लाख ७४ हजार उकळले

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर : दिनांक ३१ ऑगस्ट २४ : मुर्तिजापूर तालुक्यातील खरब ढोरे येथील दांपत्याने अकोल्यातील सोनार व्यापाऱ्या कडून खोट्या बलात्कार प्रकरणात अडकविण्याची धमकी देऊन तब्बल १८ लाख ७४ हजार रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना रंगेहात पकडत अटक केली आहे.

घटनेचे वृत्त असे की, फिर्यादी धनश्याम बालचंद सोनी (वय ५१, धंदा – सोनार, रा. अकोला) यांची दि. १६ जून रोजी एसबीआय मुख्य शाखा अकोला येथे एका अनोळखी महिलेशी भेट झाली. तिने मोबाईल क्रमांक घेऊन सतत संपर्क साधत अखेर २ जुलै रोजी आपल्या घरी खरबढोरे येथे बोलावून घेतले.

सोनी घरी गेल्यानंतर आरोपी महिला लता थोप हिचा पती नितेश थोप आला. त्याने फिर्यादीला धमकी देत बदनामी करेल व बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेल, अशी भीती दाखवून तातडीने ३ लाख रुपये उकळले. त्यानंतर वारंवार धमक्या देत दांपत्याने फिर्यादीकडून रोख व ऑनलाईन पद्धतीने मिळून एकूण १८ लाख ७४ हजार रुपये उकळले.

इतके पैसे घेतल्यानंतरही आरोपींनी दि. ३० ऑगस्ट रोजी आणखी ५ लाखांची मागणी केली. त्यातील १ लाख रुपये देण्यास फिर्यादी तयार असल्याचे कळताच पोलिसांनी सापळा रचला. मुर्तिजापूर – अकोला रोडवरील टोलनाक्यावर आरोपींना फिर्यादीकडून १ लाख रुपये स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात पकडले.

अटक आरोपी

१. लता नितेश थोप (वय ३०)

२. नितेश उर्फ निलेश प्रभाकर थोप (वय ३९)(दोघे रा. खरबढोरे, ता. मुर्तिजापूर)

कारवाईत सहभागी अधिकारी

या कारवाईत मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चीत चांडक, अपर पोलीस अधिक्षक श्री. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सौ. वैशाली मुळे, पो.नि. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. श्रीधर गुठ्ठे, पो.उप.नि. चंदन वानखडे यांच्यासह अंमलदार पथकाने सहभाग घेतला.सदर आरोपींना अटक करून पुढील तपास पो.उप.नि. चंदन वानखडे हे स.पो.नि. श्रीधर गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!