Join WhatsApp group

मुर्तीजापूरात अल्पवयीनची भावनिक फसवणूक; पोक्सोचा गुन्हा दाखल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर (दिनांक १०) — शहरातील इंदिरा नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वासघात करणाऱ्या युवकाविरोधात पोक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्च 2024 ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीत घडल्याची तक्रारीत नोंद आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आदीनाथ संदीप मते (वय 20, रा. गोगलगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे प्रलोभन दाखवत तिच्याशी अनुचित संबंध प्रस्थापित केले. याच कालावधीत आरोपीने पैशांची गरज असल्याचे सांगत मुलीच्या घरातील सोन्याचे दागिने आणून देण्यास भाग पाडले. विश्वासात घेऊन मुलीने आईकडील 9 ग्रॅमची सोन्याची पोथ व वडिलांची 11 ग्रॅमची सोन्याची चैन आरोपीकडे दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

नंतर दागिने परत मागितले असता युवकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने मुलीने भीतीमुळे घडलेली घटना घरी गुप्त ठेवली. अखेर परिस्थिती गंभीर झाल्याने तिने 10 डिसेंबर रोजी आपल्या कुटुंबीयांना सर्व माहिती दिली आणि त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात पोक्सो कायदा कलम 4(1), तसेच कलम 69, 318(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल श्याम मडावी हे करीत असून, गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही हेड कॉन्स्टेबल शैलेश मेश्राम यांनी केली आहे.

पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून प्रकरणाची पुढील तपास प्रक्रिया सुरू आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!