Join WhatsApp group

कार्यकर्ता मस्त हॉटेल वाले त्रस्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – २४ नोव्हेंबर २४ – दिवसभर एक गाडीत ५ ते ६ कार्यकर्ते बसवून ग्रामीण विभागात प्रत्येक पक्षाचे दौरे सुरु आहे, हेच दौरे ५ तारखे पासून अजून जोमाने सुरु होईल नंतर प्रचार साठी गाड्या पण वाढतील आणि कार्यकर्ते पण कार्यकर्त्यांनी आप आपल्या पक्ष साठी घर दार सोडून अहोरात्र मेहनत करायला सुरुवात केली आहे.

जेव्हा पर्यंत भाऊ दादा साहेब निवडून येत नाही तेव्हापर्यंत घरी मुला बाळांचा चेहरा सुद्धा पाहणार नाही असा असा पवित्रा काही कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

दिवसभर प्रचार, कॉर्नरसभा, मीटिंग असे वेगवेगळे कार्यक्रम आटपून सगळ्या गाड्या बारा ते एक वाजेपर्यंत मुर्तीजापुर मध्ये पोहोचतात घरी जाऊन जेवण केल्यापेक्षा बाहेर जेवावे अशी सगळ्यांची इच्छा असते.

कारण निवडणूक झाल्यावर अशी संधी काहींनाच परत भेटते. प्रचाराच्या गाडीमध्ये ड्रायव्हर सोबत कंडक्टर सीटवर एक बॉस सुद्धा असतो त्या बॉसच्या म्हटल्याप्रमाणे ही गाडी चालते बॉस उमेदवाराच्या जवळचे पण बॉस फुल रिकामे भाईगिरी दादागिरी चमचेगिरी बॉसला खूप चांगल्या पद्धतीने जमते आणि बॉस म्हणजे राजकारणातले महामेरू.

बॉसला सकाळी एक गाडी व काही कार्यकर्ते दिले जातात पेट्रोल पंप वर पेट्रोल भरून तेथे उमेदवारीची उधारी चालते त्यासाठी पैसे देण्याची गरज नाही आणि खिशात काही पैसे चहापाण्यासाठी जेवणासाठी दिले जाते पण बॉस त्यामधले काही पैसे पहिलेच बाजूच्या खिशात ठेवून अर्ध्या पैशात लोकांच्या घरी चहा पणी पिऊन नाश्ता करून आपले प्रचार सुरू ठेवतो आणि नंतर रात्री कार्यकर्त्यांना घेऊन हॉटेल वाल्यांचे बिल पाच पाच हजार रुपये दररोज बनवतो उधारी न दिल्याने तो त्यांच्यावर भाईगिरी ची भाषा वापरतो यामुळे सध्या मुर्तीजापुरचे हॉटेल व बार वाले व्यापारी त्रस्त आहेत.

आता तो बॉस कोण याच्यावर जास्त विचार करू नये,


Share

Leave a Comment

error: Content is protected !!