Join Whatsapp

ड्रग्स टोळी कारखाण्याचा आरोपी मालक अद्याप फरार – अकोला स्थानिक गुन्हे शाखेचा एका अधिकाऱ्या वर प्रश्न चिन्ह

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा : अकोला दिनांक ०३ : अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मागील ऑक्टोबर महिन्यात बर्शिटाकळी येथे धाड टाकून ड्रग्स कारखाने उध्वस्त केले होते, तसेच एकूण २,३८,७०,००० रुपयाचे मुद्देमाल हि जप्त केले होते, त्या मध्ये आदिल मो. शमीम अन्सार (३६ वर्ष ) पवन माणिक मुदनदर, (३० वर्ष मुंबई ) निरास नियाजी मुख्तार नियाजी (४५ वर्ष अकोट फैल अकोला ) मो. इरफान मो.युसुफ ( ४० वर्ष गंगा नगर अकोला ) फिरोज खान शब्बीर खान (५० वर्ष गंगा नगर अकोला ) आदिल मो. शमीम अन्सार या आरोपिन वर कारवाई सुद्धा केली होती.

पण मात्र त्या वेळेस मो.शफी यांचा जिनिंग कारखाण्यात हे काम सुरु होते, त्या जिनिंग मालकाला सुद्धा या प्रकरणात आरोपी बनविण्यात आले होते, पण दोन महिने उलटूनहि कारखान्याचा मालक आरोपी अद्याप हि फरार असल्याचे समजते, सरकार माझा न्यूज ने या प्रकरणाचा आढावा घेतलास स्थानिक गुन्हे शाखेचा एक वरिष्ठ अधिकारी यांना या आरोपीची सगळी माहिती असताना सुद्धा त्याला त्या अधिकार्याचा आशीर्वाद लाभल्याचे समजते. आता तो आशीर्वाद कोणत्या स्वरुपात लाभला? कि या मध्ये कुठला राजकीय हस्तक्षेप आहे? असे अनेक गंभीर प्रश्न या अधिकाऱ्या वर उपस्थित होत आहे.

आता त्या जिनिंग कारखाण्याचा आरोपी मालकाला कधी अटक होते हे पाहणे रोचक ठरणार आहे.

सरकार माझा – लोकहितार्थ अर्पण…………


Share

Leave a Comment

error: Content is protected !!