Join WhatsApp group

“जगभ्रमंतीच्या स्वप्नाला धक्का! मुंबईकर मराठी युवकाची बाईक UK मध्ये चोरीला”

Photo of author

By Sarkarmzanews

Share

जगभर दुचाकीवर फिरण्याचं स्वप्न आणि आव्हान घेऊन युनायटेड किंगडममध्ये दाखल झालेल्या महाराष्ट्रियन मोटारसायकल स्वाराची बाईक चोरीला गेली आहे. या दुचाकीस्वारानं आतापर्यंत 15,000 मैल (24,140 किमी) प्रवास केला होता. परंतु, ज्या बाईकवरून त्याने आतापर्यंत इतका प्रवास केला तीच युनायटेड किंगडममध्ये (UK) चोरीला गेली आहे.

महाराष्ट्रियन योगेश आलेकरीने 1 मे रोजी मुंबईहून आपल्या मोटारसायकल चॅलेंजची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने आशिया आणि युरोपमधील 17 पेक्षा जास्त देशांचा प्रवास केला होता.

33 वर्षीय योगेशने सांगितलं की, त्याची केटीएम 390 अ‍ॅडव्हेंचर बाईक UKच्या नॉटिंगममधील वॉलेटन पार्कमध्ये पार्क केली होती. त्या बाईकसोबत बरंच सामानही होतं. त्या ठिकाणाहून गुरुवारी सकाळी साधारण 11 वाजता बाईक आणि साहित्याची चोरी झाली.

योगेशचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत. तो त्याच्या प्रवासाची सर्व माहिती सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यानं एका पोस्टमध्ये ही चोरी ‘खूप वेदनादायी’ होती आणि त्यामुळे तो ‘खूप दुखावला’ असल्याचं म्हटलं आहे.

योगेशच्या अनेक पोस्ट या मराठीत देखील आहेत. आतापर्यंत 47 देशांना भेट दिल्याचे त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बायोमध्ये लिहिले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!