Join WhatsApp group

आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये महानगरातील प्रथम कॉग्रेड रनर बनले डॉ अभिजीत लऊळ

Photo of author

By Sarkarmzanews

Share

१३ जून २५ : अकोला : अनेक वर्षापासून निरनिराळ्या राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत अकोल्याचे प्रतिनिधित्व करणारे ऑर्थोपेडिक तज्ञ डॉ अभिजीत लऊळ हे दक्षिण आफ्रिकेतील डरबन शहरात झालेल्या ‘कॉग्रेड आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये प्रथम कॉम्रेड रनर चे मानकरी ठरलेत. त्यांना या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये ब्रांझ पदक मिळाले असल्याची माहिती शुक्रवारी आयएमए सभागृहात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

आयएमएचे अध्यक्ष डॉ संतोषकुमार सोमानी, सचिव डॉ. प्रदीप अग्रवाल, डॉ सागर प्रवाल, डॉ सागर भुईभार, कोषाध्यक्ष डॉ गोविंद खंडेलवाल, डॉ रचना लउछ यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय कॉम्रेड मॅरेथॉन विजेते डॉ अभिजीत लऊळ यांनी या मॅरेथॉनची माहिती दिली. दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक मॅरेथॉन मध्ये अनेक देशांचे 22 हजार धावपटू सहभागी झाले होते. अकोला जिल्ह्यातून आपण या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.

दक्षिण आफ्रिकेतील प्रिटर्स मॅट्सबर्ग या शहरातून 90 किमी ची ची ही ही कॉम्रेड कॉग्रेड आंतररा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन प्रारंभ होऊन त्याचे समापन डरबन शहरात झाले. 12 तास अंतर असलेल्या या मॅरेथॉनच्या 90 किलोमीटरचे अंतर डॉ लऊळ यांनी अवघ्या 10 तास 56 मिनिटात कापून कांस्य पदकावर आपले नाव कोरून अकोल्याचे नाव जागतिक पातळीवर उंचावले. शारीरिक सुदृढता व शारीरिक गती मानता यासाठी आपणास या विषयाची आवड होती. सन 2014 पासून वसंत देसाई क्रीडांगणावर आपण रनिंग सुरू केले. त्यानंतर कृषी विद्यापीठा मध्ये आपण धावण्याचा सराव केला.

सन 2016 पासून आपण मॅरेथॉन मध्ये सहभ सहभागी होत गेलो. सन 2016 मध्ये टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये आपण सहभाग घेतला. तर 2024 पासून फुल मॅरेथॉन मध्ये आपण सहभागी होत गेलो असल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी आपण अनेक मॅरेथॉन मध्ये सहभागी झालो, त्यामध्ये 35 किमीची लोणावळा अल्ट्रा मॅरेथॉन तर या वर्षीची 50 किमी ची लोणावळा अल्ट्रा मॅरेथॉन, सप्टेंबर मधली सातारा हिल मॅरेथॉन, ऑक्टोंबर मधली पुणे मॅरेथॉन, एप्रिल मधली 56 किमी ची लवासा मॅरेथॉन, 65 किमी ची पुणे मुठा घाट मॅरेथॉन व 68 किमीची सातारा हिल मॅरेथॉन आदी मध्ये आपण सहभाग घेतला असून वरील सर्व मॅरोथॉन मधे आपणास पुणे येथील डॉ योगेश सातव यांचे मोठे मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या व्यतिरिक्त आपण नागपूर ते एम पी पर्यंतची 200 किलोमीटरची सायकल स्पर्धा 8 तास 12 मिनिटात पूर्ण केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. युवकांनी शारीरिक सुदृढता व फिटनेस साठी अशा स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होऊन आपली व सामाजिक सुदृढता अबाधित राखण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन डॉ. लऊळ यांनी यावेळी केले. डॉक्टर लऊळ यांच्या या मौलिक उपलब्धतेवर त्यांचे डॉ प्रशांत मुळावकर, डॉ पराग टापरे, डॉ संजय शिंदे, डॉ गोविंद खंडेलवाल, डॉ किशोर पाचकोर, डॉ महेश गांधी, डॉ मो अस्लम, डॉ अभय जैन, डॉ विजय आहुजा, डॉ अर्चना टापरे, डॉ अनुप कोठारी, आनंद मनवानी, निशा मनवानी, संजय पंजवानी समवेत वैद्यकीय विश्व व सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने कौतुक करण्यात आले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!