Join WhatsApp group

दिवाकर दादा काटे यांची शिवसेना (ऊ.बा.ठा.गट) उपशहर प्रमुख पदी निवड

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर -12 ऑक्टोबर 24- गाडगे महाराज क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राष्ट्रीय खेळाडू कबड्डीचे शेकडो राज्यस्तरीय खेळाडू आज पर्यंत तयार केलेले आहे.

गाडगे बाबांचे कट्टर भक्त आणि शाहू फुले आंबेडकर या विचाराने छत्रपती शिवाजीचा महाराजांचा वारसा घेऊन चालणारे दिवाकर भाऊ काटे शेतकऱ्यांचे शेतकरी युवा नेते म्हणून यांची मुर्तीजापुर तालुक्यात ओळख आहे.

क्रीडा क्षेत्र व राजकारणापासून त्यांचे नाळ युवा अवस्थेपासून जुडलेली आहे श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श ठेवून समाजकारण मधून राजकारण करणे हे त्यांचे ध्येय आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अकोला जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षामध्ये त्यांची उपशहर प्रमुख म्हणून दिनांक 10 ऑक्टोंबर 24 रोजी त्यांची निवड करण्यात आली.

निवड करताना विनायक भाऊ गुल्हाने यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले कार्यक्रमाच्या वेळेस संतोष चौधरी,आशिष नवघरे, विकास लकडे, आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या निवडीचे श्रेय त्यांनी माननीय आमदार नितीन बाप्पु देशमुख व सर्व शिवसैनिकांना दिले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!