Join WhatsApp group

जिल्हास्तरीय ISF आयोजित World School Volleyball (U-15) निवड चाचणी उत्साहात संपन्न

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – दिनांक ११ ऑगस्ट २५ – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार व जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल (U-15 मुले व मुली) निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील विविध भागांमधून मुला-मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या निवड चाचणीतून निवड झालेल्या ५ खेळाडूंना दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी अमरावती येथे होणाऱ्या विभागीय निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे

.निवड समितीत हॉलिबॉल क्रीडेत NIS प्रशिक्षक श्री. नितीन वाघमारे, जिल्हा पासिंग हॉलिबॉल संघटनेचे सचिव संतोष गजभिये आणि उदय हातवळणे यांचा समावेश होता.

स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी डॉ. अभिजित फिरके, निशांत वानखडे, रवी खंडारे आणि गजानन चाटसे यांनी विशेष परिश्रम घेतले, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट यांनी दिली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!