Join WhatsApp group

श्री. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत विविध प्रमाणपत्रांचे वाटप – आ. रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला उपक्रम

Photo of author

By Sarkarmzanews

Share

बोरगाव मंजू (प्रतिनिधी) | ४ ऑगस्ट:बोरगाव मंजू येथील पं.ना. विद्यालयात श्री. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अंतर्गत विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अकोला तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या सहकार्याने राबविण्यात आला.

या उपक्रमात सातबारा उतारा, फेरफार दाखला, आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजनेचे दाखले अशा विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. बोरगाव मंजूचे मंडळ अधिकारी हरिहर निमकडे यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाला पुरुषोत्तम गायवाडे, प्रवीण चव्हाण, अर्चना चव्हाण, अंजली इंगोले, सुनीता दातकर, संघमित्रा सदाशिव, राधा राठोड, संतोष ठाकूर, अमोल कुंभारे, सेतू संचालक धम्हा सेंडे आणि मनीष तिवारी यांच्यासह गावातील अनेक पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी – देवानंद मोहोड, बोरगांव मंजु


Share

Leave a Comment

error: Content is protected !!