Join WhatsApp group

मुर्तिजापूर : लाखो रुपये खर्च करूनही नगरपरिषद पूर्णपणे अपयशी! आठवडी बाजारात अनधिकृत मटण दुकानांची उधळण — दुर्गंध, कुत्र्यांचा उपद्रव वाढला; नागरिक संतप्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : दिनांक ०७ : मुर्तिजापूर नगरपरिषदेकडून आठवडी बाजारात व्यापाऱ्यांसाठी लाखो रुपयांचा खर्च करून शिस्तबद्ध व्यवस्था उभारली गेली. परंतु नगरपरिषदेकडील ढिसाळ नियोजन आणि पूर्ण निष्क्रियतेमुळे ही सर्व सुविधा आज पूर्णपणे वाया गेल्याचे चित्र समोर आले आहे.

नगरपरिषदेकडूनच निश्चित केलेल्या जागेवर बसण्याची सक्ती न करता, अनेक मटण विक्रेते आठवडी बाजाराच्या तोंडावरच उघड्यावर बंड्या लावून बसतात. यावर नगरपरिषद कसलीही कारवाई करत नाही, हे नागरिकांच्या रोषाचे मोठे कारण ठरत आहे.

याशिवाय स्टेशन परिसर, अकोला नाका परिसर, तसेच शहरातील अनेक भागांत अनधिकृत मटण दुकाने सर्रास सुरु असून, नगरपरिषदेची देखरेख शून्य असल्याचे उघड झाले आहे. स्वच्छतेचा पूर्ण बोजवारा, रस्त्यावर फेकलेला मटण कचरा, नाल्यात सांडपाणी न सोडणे यामुळे दररोज परिसरात असह्य दुर्गंध पसरत आहे.

याच अनधिकृत व्यवसायांमुळे भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढून मुलांवर हल्ले, तसेच रस्त्यावर गाड्यांच्या मागे धाव घेऊन अपघात घडण्याच्या घटना वाढल्या आहेत. तरीही नगरपरिषद आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभाग पूर्णपणे हातावर हात ठेवून बसल्याची तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.


मटण दुकानांसाठी कायदेशीर नियम — जे नगरपरिषद अंमलात आणण्यात अपयशी

परवाना नसलेल्या दुकानांवर त्वरित दंडात्मक कारवाई

आठवडी बाजारातील निर्धारित जागेतच बसणे बंधनकारक

उघड्यावर मटण कापण्यास सक्त मनाई

मांस कचरा रस्त्यावर टाकण्यास दंड

सांडपाणी व्यवस्थापनाची सक्त अट

दुकान परिसर स्वच्छ ठेवणे अनिवार्य

परंतु हे सर्व नियम कागदावर असून, अंमलबजावणी शून्य — असे नागरिकांचे आरोप आहेत.


नागरिकांचे नगरपरिषदेला थेट प्रश्न व मागण्या :

नगरपरिषद काय पहाते आहे? अनधिकृत मटण दुकाने हटवण्याची हिम्मत आहे का?

आरोग्य विभाग दररोज हजेरी लावताना ही दुर्गंधी दिसत नाही का?

लाखो रुपये खर्च करून बनवलेली आठवडी बाजाराची व्यवस्था नेमकी कोणी पाळायची?

भटक्या कुत्र्यांमुळे मुलांना चावे लागत आहेत — जबाबदार कोण?

तात्काळ मोहीम राबवून सर्व नियमभंग करणारी दुकाने बंद करावीत!

नागरिकांनी नगरपरिषदेवर थेट टीका करत, तातडीने कारवाई न झाल्यास मागच्या सारखे मोठे आंदोलन उभे करू असा इशाराही दिला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!