Join WhatsApp group

पीडित अतिक्रमणधारकांची मागणी : बियाणी जीन परिसरात हॉकर्स झोन द्या मुर्तीजापूर नगरपरिषदेला निवेदन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर : (दि. १८ जुलै २५) शहरातील अतिक्रमण कारवाईत अनेक छोटे व्यवसाय करणारे नागरिक उघड्यावर आले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या पीडित अतिक्रमण धारकांकडून शहरातील मध्यभागी असलेले बियाणी जीन परिसरात हॉकर्स झोन निर्माण करून व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे.

मुर्तीजापूर नगरपरिषदेकडून अलीकडच्या काळात शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविण्यात आली. परंतु कोणतीही पुनर्वसनाची व्यवस्था न करता अचानक पद्धतीने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनेकांच्या हातचे रोजगार गेले आहेत. विशेषतः हातगाडीवाले, छोटे विक्रेते, फळविक्रेते यांना मोठा फटका बसला आहे.

या पार्श्वभूमीवर अतिक्रमणधारकांच्या वतीने स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचा नावाने निवेदन देण्यात आले व अधिकाऱ्यांची भेट घेऊन बियाणी जीन परिसरात ‘हॉकर्स झोन’ मंजूर करण्याची लेखी मागणी केली. यामुळे व्यवसायांवर गदा येणार नाही आणि शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणही नियंत्रणात राहील, असा युक्तिवाद करण्यात आला.

पीडितांचे म्हणणे आहे की – “आम्हाला व्यवसाय करण्याची परवानगी द्या, आम्ही रस्त्यावर अडथळा ठरणार नाही. पण नगरपरिषदेनं पर्यायी व्यवस्था न करता कारवाई केली, त्यामुळे आमच्या घरात उपासमार सुरू झाली आहे.”

दरम्यान, या मागणीची दखल नगरपरिषद घेणार का? आणि हॉकर्स झोनची मागणी कितपत मार्गी लागेल, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

संपर्कात राहा – मुर्तीजापुर शहरातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी!


Share

Leave a Comment

error: Content is protected !!