Join Whatsapp

दहिवडी येथे गणराया अवार्ड वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Photo of author

By Sir

Share

दहिवडी पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव मंडळ, पत्रकार, पोलीस पाटील यांचा सन्मान….

सातारा जिल्हा प्रतिनिधी नवनाथ भिसे :दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील गणराया अवार्ड २०२४ पारितोषिक वितरण सोहळा अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या उपस्थितीत हा मोठ्या थाटात करण्यात आला. माण तालुक्यातील पत्रकार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन तर पोलीस पाटील यांना आदर्श सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

यावेळी Dysp अश्विनी शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आदर्श शाळेचे मुख्याध्यापक लालासाहेब दडस उपस्थित होते. गणराया अवॉर्ड पारितोषक वितरण समारंभामध्ये दहिवडी हद्दीतील पारंपारिक सामाजिक शैक्षणिक तसेच अध्यात्मिक उपक्रम राबवणाऱ्या गणेश उत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यामध्ये सर्वेश्वर गणेशोत्सव मंडळ नरवणे यांचा प्रथम क्रमांक, नेहरू युवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तोंडले यांचा द्वितीय क्रमांक, शिवतेज गणेश उत्सव मंडळ दहिवडी तृतीय क्रमांक, शिवबा गणेशोत्सव मंडळ दहिवडी चतुर्थ क्रमांक, साई व्यापारी गणेश उत्सव मंडळ दहिवडी पाचवा क्रमांक, असे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये बोलताना डॉ. वैशाली कडूकर म्हणाले की, या गणराया अवार्ड मध्ये ज्या गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेऊन पारंपरिक सामाजिक असे विविध उपक्रम राबवले.गणेशोत्सवा बरोबरच येणारे नवरात्र उत्सव सुद्धा पोलीस प्रशासनासोबत सहकार्य करून शांततेत करावी.

ज्या पद्धतीने अशी विविध उपक्रम राबवले जातात त्याच पद्धतीने समाजामध्ये मुलींना सुद्धा समानतेची वागणूक देऊन तरुण मुलांनी व समाजातील लोकांनी आपल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत या पद्धतीने काम केले पाहिजे.पोलीस प्रशासन सदैव तुमच्या सोबत आहे पण प्रत्येकच ठिकाणी पोलीस पोचतील याहीपेक्षा तुम्ही मुलींनी व तरुण मुलांनी स्वतः सुरक्षित राहणं गरजेचं आहे. डीवायएसपी. अश्विनी शेंडगे मॅडम म्हणाल्या, प्रशासनातला शेवटचा घटक हा पोलीस पाटील आहे आणि पोलीस पाटील हा गाव पातळीवरचा पोलीसच आहे गावामध्ये घडणाऱ्या सर्व घटनेचे माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम ते करत असतात.

त्याचबरोबर समाजामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणारे सर्व पत्रकार बांधव सुद्धा घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवून नेहमी सहकार्य करत असतात.तसेच गणेशोत्सव मंडळाने सुद्धा पारंपारिक व सामाजिक उपक्रम राबवत समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सर्व गणेश मंडळांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

दहिवडी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब यांनी या गणराया अवार्ड 2024 हा अवॉर्ड दहिवडी हद्दीतील गणेश उत्सव मंडळांना मिळाला पाहिजे व त्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं कार्यक्रमाचे नियोजन केलं त्याचबरोबर आपल्या सोबत काम करणारे गाव पातळीवरील पोलीस पाटील यांना पोलीस पाटील सेवा पुरस्कार तसेच पत्रकार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देण्याचे व त्याचे नियोजन करण्याचं काम तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिसरातील शाळा महाविद्यालयातील सहभाग घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी केले. तसेच शिवांजली गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी दहिवडी परिसरातील शाळा महाविद्यालय, कन्या विद्यालय आदर्श शाळा डान्सिंग अकॅडमी, पोलीस भरती करणारी स्वराज करिअर अकॅडमी यासह या सर्वांनी कार्यक्रमांमध्ये हा अवॉर्ड वितरण सोहळा चांगला होण्यासाठी सहभाग घेतला.

कार्यक्रमासाठी दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील सर्व पत्रकार बांधव सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो ओळी : अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते गणराया अवार्ड पुरस्कार स्वीकारताना सर्वेश्वर गणेशोत्सव मंडळ नरवणे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!