Join WhatsApp group

Ads

संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंट येथे हस्तकला व विज्ञान प्रदर्शनी संपन्न

By Sarkarmzanews

December 22, 2024 10:00 pm

Ads

अकोला : दिनक २२ : स्थानिक मा. ब्रा. संस्कृत विद्यालय द्वारा संचालित संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंट येथे नुकतेच विद्यार्थ्यांनी तयार केलेली विज्ञान प्रतिकृती व हस्तकला विविध कलाकृतीं चा प्रदर्शनीचा कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रदर्शनीचे सर्वप्रथम सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन संस्थेचे सहसचिव महेंद्र जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री कमलकिशोर हरीतवाल प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक अंकुश दिलीप खिडकर मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते प्रदर्शनी मध्ये शालेय विद्यार्थ्यांनी ईरिक्षा ज्वालामुखी पवनचक्की जलशुद्धीकरण यंत्र व असंख्य कलाकृती तयार केल्या या कार्यक्रमाकरिता शिक्षकांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला सर्व पालकांनी हजेरी लावली व प्रदर्शनी पाहून मोहीत झाले या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मुख्याध्यापक अंकुश खिरळकर यांच्या नेतृत्वात शिक्षक आशिष शाहू संजय चव्हाण सारिका चौधरी पल्लवी डोंगरे यांनी सुरेख मार्गदर्शन केले या प्रदर्शनी मध्ये महिला पालकांची रांगोळी स्पर्धा सुद्धा घेण्यात आली कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन व आभार शिक्षिका मेघा शाहू यांनी केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शालेय कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!