Join WhatsApp group

मूर्तिजापूरात होते रोज गोवंशाची कत्तल – गोवंश हत्याबंदी कायदा धाब्यावर;हा घ्या पुरावा – रस्त्याच्या कडेलाच टाकली जाते घाण

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १७ जून २५ : संजय उमक :मूर्तिजापूर शहरात गुरांची रोज कत्तल होत असल्याचे चित्र आहे गोवंश हत्या बंदी कायदा होऊन शहरात गोवंशाची सर्रास कत्तल होत असल्या स्पष्ट होते, कायद्याला जुमानता कायदाच धाब्यावर बसला असून यासाठी कोणाचे आहे. कोणाच्या आशिर्वादने हा व्यवसाय चालतो हाच खरा प्रश्न आहे.


येथील राष्ट्रीय महामार्गावरील आसरा फाटा रस्त्याच्याच कडेला उघड्यावर कत्तल करण्यात आलेल्या गुरांचे खाण्यायोग्य नसलेले व निरुपयोगी मांस, रक्त उघड्यावर फेकले जातात. जर मूर्तिजापूर शहरात गुरांची कत्तल होत नसेल तर हे रोज निरुपयोगी मांस कुठून येते हेही याठिकाणी महत्त्वाचे आहे व हे कृत्य करणाऱ्यांना कोणाचे अभय आहे याचाही शोध घेणे अगत्याचे आहे. दरदिवशी गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडण्याच्या बाता मारल्या जातात अगदी नाकावर टिच्चून शहरातच रोज शेकडो गुरांची कत्तल होत असलेले हे अघोरी कृत्य का दिसत नाही असाही सवाल नागरीकांनी उपस्थित केला आहे.


अगदी वर्दळीच्या रस्त्याच्याच कडेला हे मांस टाकल्या जात असल्याने ते कुजून त्याची दुर्गंधी संपूर्ण परीसरात पसरल्या जाते पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात आजार तोंड वर काढतात अशा कृत्यामूळे घरकुल व इतर परीसरात रोगराई झपाट्याने पसरून त्या परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या नागरीकांच्या जीवनाला सहाजिकच धोका निर्माण होऊ शकतो, त्याच बरोबर या रस्त्यावरुन ये- जा करणारांना प्रचंड दुर्गंधी व घाणीचा सामना करावा लागतो.
महाराष्ट्र शासनाने गायीला राज्यमातेचा दर्जा दिला आहे तरीही मूर्तिजापूर शहरात गोवंशाची कत्तल होते ही गांभीर्यजनक बाब समोर आली आहे. या घटनेकडे कोण दुर्लक्ष करीत आहे शासन, नगर परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी, पोलीस, की, राजकीय पुढारी असाही ही जाब नागरीक या निमित्ताने विचारत आहेत. अशाप्रकारे गोवंशाची कत्तल करुन घाण पसरविल्याने नागरीकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्यांवर कारवाई होत नाही हाच यक्षप्रश्न आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!