Join WhatsApp group

येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर | ४ ऑगस्ट |

येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात राजकीय समीकरणं झपाट्याने बदलत चालली आहेत. सध्या चर्चेचा विषय ठरत आहे, तो म्हणजे भाजपचे अनुभवी आमदार हरीश पिंपळे यांनी दिलेल्या एका काँग्रेस नेत्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा — आणि त्यातून निर्माण झालेल्या शक्यता.

भाजपचे कट्टर कार्यकर्ते आणि समर्थक हे मान्य करतात की, भारतीय जनता पक्ष रात्रंदिवस एक करून देशाला ‘विश्वगुरू’ बनवण्याच्या दिशेने काम करत आहे.

याउलट काँग्रेस पक्षाला गल्ली ते दिल्ली पर्यंत प्रत्येक निवडणुकीत तगडं आव्हान देण्यासाठी भाजप कार्यकर्ते झटत आहेत.

मागील १६ वर्षांपासून आमदार असलेले हरीश पिंपळे यांनी विधानसभेपासून ते मुख्यमंत्री कॅबिनेट मीटिंगपर्यंत आपली ठोस उपस्थिती आणि विधानसभेत जनहितार्थ भूमिका मांडत संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यामुळे आज ते अकोला जिल्ह्यातील एक प्रभावशाली किंगमेकर म्हणून पाहिले जात आहेत.मात्र नुकत्याच एका काँग्रेस नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हरीश पिंपळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले.

या काँग्रेस नेत्याची प्रतिमा होतकरू युवा नेता, सामाजिक कार्यकर्ता, प्रतिष्ठित व्यापारी आणि माजी उपनगराध्यक्ष अशी आहे. मूर्तिजापूर शहरात त्यांचं जनतेशी घनिष्ठ नातं असल्याचं बोललं जात आहे.या दोघांची जवळीक आणि परस्पर सन्मानाचं वातावरण पाहता, हरीश पिंपळे हे मूर्तिजापुरातील विशिष्ट समाजाला न्याय देण्यासाठी, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन काँग्रेसचा सुपडा साफ करतील का?

असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.

अर्थात, राजकारणात प्रत्येक हालचाल ही रणनीतीचा भाग असतो. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हरीश पिंपळे कोणत्या भूमिकेत दिसतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!