Join WhatsApp group

मुर्तीजापूर तालुका क्रीडा संकुल परिसराचा मागे मटण-चिकनच्या दुर्गंधीने नागरिक आणि खेळाडू त्रस्त : आरोग्य व स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण – नगर परिषद विसरली स्वच्छ भारत अभियानची परिभाषा?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर (प्रतिनिधी) : दिनांक २५ ऑक्टो. २५ : तालुका क्रीडा संकुल परिसर हा शहरातील युवक, विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी तंदुरुस्तीचे केंद्र मानला जातो. मात्र सध्या या परिसरात मटण व चिकन विक्री करणाऱ्या दुकानांमुळे असह्य दुर्गंधी पसरून वातावरण दूषित झाले आहे. त्यामुळे खेळाडू, महिला आणि क्रीडा संकुलवर येणारे नागरिक त्रस्त झाले असून या परिसरातील आरोग्य व स्वच्छतेचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू लागला आहे.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी दिवशी लोकप्रतिनिधी, तहसीलदार, व अन्य पाहुण्यांनी सुद्धा या दुर्घंधीचा आस्वाद घेतला आहे. तरी या वर आज पर्यंत कुठलेही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसून मा. तहसीलदार, लोकप्रतिनिधी, माजी खेळाडू या क्रीडा संकुलाचा सिमिती मध्ये आहे. तरी सुद्धा क्रीडा संकुलाचा या समस्ये वर आज पर्यंत उपाय योजना करण्यात आली नसून क्रीडा संकुल सिमितीचा कोणत्याही पदाधीकार्याने या वर आज पर्यंत लक्ष दिले नाही व नगरपरिषदला एकही पत्र या बाबत दिले नाही हि शोकांतिका आहे . क्रीडा संकुल हे फक्त शहरातील विकासाचा देखावा आहे का? असे मत तिथे येणाऱ्या नागरिकांचे आहे.

दररोज सकाळ-संध्याकाळ क्रीडा संकुलात शेकडो विद्यार्थी धावण्याचा व वेगवेगळ्या क्रीडा प्रकार व इतर खेळांचा सराव करतात. पण संकुलाच्या शेजारी असलेल्या मटण व चिकन विक्री केंद्रांमधून येणारा रक्तयुक्त कचरा, हाडे व अवशेष क्रीडा संकुलच्या मागे टाकले जात असल्याने कुजकट वासाने संपूर्ण परिसर असह्य झाला आहे. अनेकदा इथे माशा व कुत्र्यांचा उपद्रवही वाढत असून त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

“दररोज सकाळी किंवा संध्याकाळी खेळायला गेलो तरी दुर्गंधीने दम घुटतो. मुलांना खेळायला नेणं अवघड झालंय. नगर परिषदेकडे अनेक वेळा तक्रार केली, पण कोणीही लक्ष देत नाही.” येथे येणाऱ्या खेळाडू व नागरिक म्हणणे आहे.

दरम्यान, मटण विक्रेत्यांनी मात्र स्वतःची बाजू मांडत सांगितले की, “आम्ही कचरा रस्त्यावर टाकू इच्छित नाही. पण नगर परिषदेकडून आठवडी बाजाराच्या दिवशी किंवा ठराविक वेळेत कचरा उचलण्यासाठी गाडी दिली, तर आम्ही तो सर्व कचरा त्यात टाकू. मात्र सध्या नगर परिषदेने कोणतीही अशी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे आम्हालाही अडचण येते.”

सध्या शहरातील नियमित कचरा संकलनासाठी मर्यादित गाड्या आहेत. पण याचं उपयोग सार्वजनिक जागेवर का होत नाही? प्रश्न असा निर्माण होतो कि नगर परिषद स्वच्छ भारत अभियानची परिभाषा विसरली आहे का ?

या सर्व परिस्थितीमुळे क्रीडा संकुल वर येणाऱ्या खेळाडू व नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. खेळाडू, पालक व आरोग्यप्रेमी नागरिकांनी प्रशासनाला सरकार माझा न्यूजचा माध्यमातून विनंती केली आहे की, क्रीडा संकुलासारख्या सार्वजनिक आरोग्य व क्रीडा स्थळांच्या आसपास स्वच्छतेची काटेकोर व्यवस्था ठेवावी, मटण-चिकन विक्रीसाठी संकुला पुन दूर स्वतंत्र जागा निश्चित करावी आणि कचरा व्यवस्थापनासाठी दर आठवडी बाजारा दिवशी तरी कचरा गाडी उपलब्ध करून द्यावी.

स्थानिक सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेत स्वच्छता मोहिम राबविण्याचा इशारा दिला आहे. जर नगर परिषदेकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर नागरिक आणि खेळाडू आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!