Join WhatsApp group

चीन पाकिस्तानची भाषा काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष बोलून सैनिकांचे मनोबल तोडण्याचं काम करत आहे – आमदार सावरकर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २१ – अकोला – चीन पाकिस्तानची भाषा काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष बोलून सैनिकांचे मनोबल तोडण्याचं काम करत आहे एकीकडे देशभक्तीसाठी तिरंगा यात्रा काढण्याचा नाटक करायचं दुसरीकडे सैनिकाचे मनोबल पाकिस्तानी आणि चीनची भाषा बोलावी हे राजीव गांधी आणि त्याची सहकारी करत असून अशा प्रवृत्ती पासून सावध राहण्याची गरज आहे व राष्ट्र चेतना सैनिका यांचा सन्मान त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी देशांमध्ये भाजपाने तिरंगा यात्रा काढल्यानंतर उशिरा पण काँग्रेसला सुचला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सैन्यांना पूर्ण सुविधा उपलब्ध करून देऊन सीमेवर रस्ते सैनिकांना साहित्य उपलब्ध करून अकरा वर्षांमध्ये सेना मजबुतीकरण करण्याचे काम केल्याचा परिणाम म्हणून आज जगात भारतीय सेनेचा व भारतीयांचा सन्मान वाढला आहे एक ताकद या पहेलगाम घटनेमुळे जागतिक स्तरावर दिसून आली असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस विधिमंडळ प्रसाद प्रतोद रणधीर सावरकर यांनी केले.
माजी सैनिकांचा सन्मान व आशीर्वाद घेऊन बोरगाव मंजू येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली भारत मातेचे पूजन व वीर जवान सैनिकांचा गौरव करून आमदार रणधीर सावरकर यांनी बोरगाव मंजू परिसरात भारत माता की जय वंदे मातरम भारतीय सेनेचा विजय असो पंतप्रधान नरेंद्र मोदी आगे बढो*जय भवानी जय शिवाजी या गगनवेधी जयघोषाने बोरगाव मंजू परिसर दुमदुमले.
या देशाचा जागर मातृ शक्तीने केलाय आणि मातृशक्तीचा सन्मान यासाठी सिंदूर ऑपरेशन करण्यात आला मातृशक्तीने पाकिस्तानला आपली ताकद दाखवली ही मातृ शक्ती शक्तीचा सन्मान केवळ भारतीय सेना व देशाचा सक्षम नेतृत्व करू शकतो अशा शब्दात त्यांनी भारतीय सेना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गौरव केला
*यावेळी यात्रेमध्ये जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर मंडळ अध्यक्ष प्रवीण हगवणे माझी सैनिक लाला गवई माजी सैनिक मनोज तायडे यांचा सन्मान करण्यात आला.
शंकरराव वाकोडे माधव मानकर ज्येष्ठ नेते अण्णा उमाळे पंकज वाडीवाले संजू पाटील गावंडे अनिल गावंडे वैभव माहोरे वसंतराव गावंडे जय पाटील ठोकळ सुबोध गवई बंटी मांगे विवेक भरणे महेंद्र काळे विशाल जयस्वाल सचिन तायडे छोटू देशमुख अंकुश इंगळे किशोर काकडे विपुल आवारे व परिसरातील बहुसंख्या नागरिक उपस्थित होते*


Share

Leave a Comment

error: Content is protected !!