Join WhatsApp group

“निवडणुकीच्या वार्‍याबरोबर रंग बदलणारे उमेदवार; मतदारांमध्ये संभ्रमाची स्थिती – अखेर हे उमेदवार कोणत्या शिवसेनेचे?”

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर : दिनांक २९ : शहरातील निवडणुकीत समीकरणं अक्षरशः क्षणाक्षणाला बदलत आहेत. एबी फॉर्म मिळवण्यासाठी काही महत्त्वाकांक्षी उमेदवारांनी अवघ्या दहा मिनिटांत दोन-तीन पक्षांची दारं ठोठावण्याचा चमत्कारच केला आहे.

कुणी भाजपमधून एका शिवसेनेत गेले, तर कुणी दुसऱ्या शिवसेनेचा हात धरला—तेही फक्त पक्षाचे चिन्ह आणि निवडणूक फंड मिळेल या “आशेवर”.

पण आता परिस्थिती एवढी गोंधळलेली आहे की तेच उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन“खाली आम्हाला मत द्या… वर कोणालाही द्या”असा कुप्रसिद्ध “कन्फ्यूजन कॅम्पेन” करताना दिसत आहेत.

यामुळे शहरात एकच प्रश्न—हे उमेदवार नेमके कोणत्या शिवसेनेचे?कारण एका शिवसेनेत प्रवेश केल्याची घोषणा करणारेच उमेदवार प्रत्यक्षात वरच्या मतांसाठी कोणाचे नाव घेत आहेत, हेच मतदारांना कळेनासे झाले आहे.

फंड नसल्यामुळे ‘सुपारी प्रचार’?

शहरात आणखी एक चर्चेचा मुद्दा धुमाकूळ घालत आहे—शिवसेना गटांमध्ये निवडणूक फंडाचा अभाव असल्याने काही उमेदवारांनी “सुपारी” घेऊन दुसऱ्या पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठीच प्रचार सुरू केला आहे का?मतदारांनाही उमेदवारांच्या या अचानक झालेल्या “लाइन बदल”चा अर्थ कळेना.

“ही संपूर्ण खेळी भाजप व इतर पक्षाची तर नाही ना?

”या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शहरभर एकच कुजबुज सुरू“अखेर ही संपूर्ण खेळी भाजपची व इतर पक्षाची नाही ना?”

कारण उमेदवारांच्या सतत बदलत जाणाऱ्या भूमिका, त्यांचे दिशाहीन संदेश, आणि मतांची नाजूक विभागणी या सर्वामुळे नागरिकांमध्ये भाजपच्या व इतर पक्षाची पडद्यामागील रणनीतीचा संशय अधिकच गडद होत आहे.

मुर्तीजापूरमधील हा राजकीय वाऱ्याचा जोर रोज सकाळ-संध्याकाळ बदलतोय.या वार्‍याची दिशा पुढे कुठे वळते याकडे संपूर्ण शहराचे डोळे खिळले आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!