Join Whatsapp

मुर्तीजापुर शहरात भाजप मध्ये विरोधी सुर जोरावर, भाजपला खिंडार बसण्याची शक्यता?

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा – २६ ऑक्टो २४ – मुर्तीजापुर मतदार संघ ३२ मध्ये जेव्हा पासून रवी राठी यांनी भाजप पक्ष प्रवेश केले आहे राजकीय गणित बिघडत चालले आहे.

हरीश पिंपळे यांनी भाजप वर व देवावर विश्वास ठेऊन सगळे त्यांचा भरोश्यावर सोडले आहे, पण मात्र निवडणूक तोंडावर असून कार्यकर्ते तडजोड करण्याचा कुठल्याही पर्याय निवडताना दिसत नाही आहे.

जर कदी रवी राठी यांना उमेदवारी मिळाली तर तालुका, शहर, ३९० बूथ प्रमुख व कार्यकर्ते एक सोबत राजीनामे देण्याचा तयारीत आहे.

रवी राठी हे काल ३ तासा मध्ये पक्षा मध्ये येऊन आपली उमेदवारी छुप्या पद्दतीने जाहीर करून फटाके फोडणे हे त्यांचा अंगलट आल्यचे दिसत आहे, कार्यकर्त्यांचे म्हणणे असे आहे की लोकसभेत खासदार अनुप धोत्रे यांचा वेळेस रवी राठी यांनी विरोधात प्रचार केले व मोदिजीना खालच्या पातळी वर जाऊन काहीचा काही बोलले,जनता चुतीय आहे असे हि विडीओ रवी राठी चे सोशल मेडिया वर आहे.

नागपूरला गेल्यावर इथल्या भाजपाचा स्थानिक नेत्यांना फोन करून मी उद्या AB फॉर्म घेऊन गावात येत आहे, तुम्ही माझा मिटिंग लावायला सुरुवात करा असे रवी राठी ने सांगितले. पक्ष प्रमुखाचे काही प्रोटोकॉल असतात त्याची सुद्धा रवी राठीला जान नाही अश्या कालचा आलेल्या माणसाला आम्ही उमेदवार मनात नाही असे कार्यकर्त्यांचे मत आहे.

मागील १५ वर्षा पासून हरीश भाऊ यांनी पक्ष बांधणी केली आहे भाजपने जर हरीश पिंपळे यांना उमेदवारी दिली नाही तर याचे परिणाम भाजपला येणाऱ्या निवडणुकीत १००% पराजय पहावी लागणार, – पप्पु मुळे( तालुका अध्यक्ष युवा मोर्चा )

भाजपा चा वरिष्ठ नेत्यांनी भूलथापानां बळी न पडता निवडून येणारी उमेदवारी न गमवून स्वताचा पायावर कुऱ्हाडी मारू नये – भूषण कोकाटे (तालुका अध्यक्ष भाजप )


Share

Leave a Comment

error: Content is protected !!