Join WhatsApp group

कुरणखेड सर्कलमध्ये मोठी राजकीय हालचाल! वंचितचा प्रभावशाली नेता भाजपच्या वाटेवर आज होणार पक्ष प्रवेश – वंचितला बसणार मोठा धक्का?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर प्रतिनिधी – दिनांक २२ ऑक्टोबर २५ : योगेश विजयकर(प्रतिनिधी)
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली आहे. कुरणखेड जिल्हा परिषद मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा प्रभावशाली नेता सुशांत पाटील बोर्डे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या घडामोडीमुळे वंचितला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत असून, स्थानिक राजकारणाचे समीकरणच बदलणार असल्याची चिन्हे आहेत.

अलीकडेच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षणानुसार कुरणखेड मतदारसंघ ओबीसी राखीव ठरला आहे. या मतदारसंघात भाजपने अद्याप आपला उमेदवार घोषित केलेला नसला, तरी सूत्रांच्या माहितीनुसार पक्ष लवकरच आपला उमेदवार जाहीर करू शकतो. आणि त्यात वंचितचा हा माजी जिल्हा परिषद सदस्य असलेला नेता भाजपमध्ये प्रवेश करतो का, हा सध्या राजकीय वर्तुळातील चर्चेचा प्रमुख विषय बनला आहे.

कुरणखेड मतदारसंघ हा गेल्या काही वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून वंचितने जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती पदही मिळवले आहे. त्यामुळे हा “वंचितचा गड” ताब्यात घेण्यासाठी भाजपने आखलेली रणनीती आता स्पष्टपणे दिसू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीतील हा निष्ठावान आणि प्रभावी कार्यकर्ता माजी जिल्हा परिषद सभापती सुशांत पाटील बोर्डे पक्षातील तिकीट वाटपात दुर्लक्ष झाल्याने नाराज होते. या नाराजीच्या पार्श्वभूमीवरच त्याने भाजपशी संपर्क साधल्याची चर्चा आहे.

आज संध्याकाळपर्यंत अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करेल, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. जर हा प्रवेश प्रत्यक्षात झाला, तर कुरणखेड सर्कलमधील वंचित बहुजन आघाडीची पकड सैल होण्याची शक्यता आहे.

स्थानिक राजकीय जाणकारांच्या मते, “वंचितचा गड मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात भाजपने थेट वंचितच्या घरात घुसून डाव साधला आहे. या प्रवेशामुळे भाजपला जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो.”

आता सर्वांचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहे की — सुशांत पाटील बोर्डे प्रवेश झाल्यास कुरणखेडचे राजकीय गणित कसे बदलते?


Share

Leave a Comment

error: Content is protected !!