Join WhatsApp group

“सनातन धर्मावर खोटं प्रेम करणाऱ्यांपासून सावध राहा” – आमदार रणधीर सावरकरांचा इशारा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला: ५ जुलै २५ : वारकरी परंपरा ही केवळ भक्तीची नाही तर सामाजिक संस्कारांची शृंखला आहे. पिढ्यानपिढ्या भक्ती आणि मानवतेची शिकवण देणाऱ्या या परंपरेचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर अकोला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरून सुटणाऱ्या अकोला-मिरज-पंढरपूर विशेष गाडी मधून 487 वारकऱ्यांना रवाना करण्यात आले. या वेळी भाजपकडून त्यांचे जलपान, फराळ व पूजन करून सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना आमदार सावरकर म्हणाले, “सनातन धर्मावर खोटे प्रेम दाखवणारे काही लोक सध्या नौटंकी करत आहेत. त्यांच्यापासून सावध राहण्याची वेळ आली आहे. धर्माबद्दल गप्पा मारण्यापेक्षा खरी श्रद्धा आणि सेवा महत्त्वाची आहे.

”कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय अग्रवाल होते. प्रमुख उपस्थितीत खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, संतोष शिवरकर, जयंत मसने, किशोर पाटील, उमेश मालू, पवन महल्ले, चंदाताई शर्मा, नितीन राऊत, माधव मानकर, गिरीश जोशी, कृष्णा शर्मा आदींचा समावेश होता.

खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातून साडेतीनशेहून अधिक विशेष गाड्या वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अकोल्यावरून गेल्या दोन वर्षांपासून चार विशेष गाड्या चालविल्या जात आहेत.

कार्यक्रमात वारकऱ्यांना श्रीफळ, शाल देऊन सन्मानित करण्यात आले. संपूर्ण परिसर भगवामय झेंड्यांनी सजवण्यात आला होता. जयघोषात वातावरण भारावून गेले होते – “जय श्रीराम”, “विठ्ठल विठ्ठल”, “तुकाराम महाराज की जय”.

प्रास्ताविक पवन महल्ले, संचालन गिरीश जोशी, आभार प्रदर्शन नितीन राऊत यांनी केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!