Join WhatsApp group

Ads

बेटा नंबरी… बाप दस नंबरी? अकोल्यातील बनावट गुटखा रॅकेटवर सलग दुसरी धडक कारवाई! अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे ऑपरेशन प्रहार

By Sarkar Maza

July 16, 2026 9:10 pm

Ads

अकोला जिल्हा पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत गुरुवारी एमआयडीसी परिसरातील एका अवैध बनावट गुटखा निर्मिती कारखान्यावर मोठी धाड टाकत तब्बल ५० लाख ७२ हजार ५६४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, कच्चा माल आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री जप्त केली.

या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि पुरवठा साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एमआयडीसी फेज-२ मधील एका गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेने अन्न व औषध प्रशासनाच्या पथकासह संयुक्त कारवाई केली.

गोदामात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याची निर्मिती सुरू असल्याचे उघडकीस आले.कारवाईदरम्यान पोलिसांनी अशोक केदारनाथ शर्मा (वय ६०, रा. बलोदे ले-आऊट, अकोला) आणि अजय लक्ष्मण जुंजाळेकर (वय २४, रा. गायगाव, अकोला) या दोघांना ताब्यात घेतले.

अत्याधुनिक मशीनवर चालत होता बनावट गुटख्याचा उद्योगछाप्यात सुपारी ग्राइंडर, केमिकल मिक्सर, गुटखा पॅकिंग व सीलिंग मशीन, ट्रे ड्रायर, एअर कॉम्प्रेसर, पाउच प्रिंटिंग मशीन यांसह लाखो रुपयांची यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. तसेच कृत्रिम फ्लेवर्स, ग्लिसरीन, कच्ची सुपारी, कथ्था, मेंथॉल, तंबाखू, मॅग्नेशियम कार्बोनेट, विविध ब्रँडचे पॅकिंग साहित्य आणि तयार गुटख्याचा मोठा साठाही हस्तगत करण्यात आला.

एकूण ५०.७२ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

एसपींच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाईही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या ही धडक कारवाई यशस्वी केली.

मुख्य सूत्रधाराचा शोध सुरूप्राथमिक तपासात हा कारखाना मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित व बनावट गुटखा तयार करून बाजारात पुरवठा करत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, तयार गुटखा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाठविला जात होता आणि या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

Related Article

बेटा नंबरी… बाप दस नंबरी? अकोल्यातील बनावट गुटखा रॅकेटवर सलग दुसरी धडक कारवाई! अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे ऑपरेशन प्रहार

अनभोरा गावात अवैध दारू विक्री पुन्हा चर्चेत? पूर्वी कारवाई झालेल्या व्यक्तींची नावे पुन्हा समोर; नागरिकांचा संताप, पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी

अकोला एमआयडीसीतबनावट गुटखा कंपनी वर कारवाई पंचनामा सुरू, आरोपींवर कायदेशीर कारवाई लवकरच

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी*शिवसेनेतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन*

“मुर्तिजापूर शहर पोलिसांची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी; चोरीतील ₹72,300 चा सोन्या-चांदीचा मुद्देमाल फिर्यादीला परत”

कृषिमंत्र्यांच्या आढावा बैठकीत अकोल्याचा मुद्दा गाजला; आमदार हरीश पिंपळे यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!