Join WhatsApp group

बॅरेज पूर्ण… पण पुनर्वसन कधी? आमदार पिंपळे सरकारला विधानमंडळात सवाल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

📍 नागपूर | दि. १२ डिसेंबर २०२५काटेपूर्णा बॅरेज (मंगरूळ कांबे) प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या जांभा (बु.) गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा विधानसभेत गाजला. आमदार हरिषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांनी आज हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधत ग्रामस्थांच्या न्याय हक्कासाठी ठाम भूमिका मांडली.

प्रकल्प सुरू होण्यापूर्वी जांभा (बु.) गावाचे १००% पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, बॅरेजचे काम पूर्ण झाल्यानंतरही ग्रामस्थांचे पुनर्वसन न झाल्याने ते अद्यापही अनिश्चिततेच्या विळख्यात आहेत. पुनर्वसनाची वाट पाहत असलेल्या गावकऱ्यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप ठोस निर्णय झाला नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे.

विधानसभेत या गंभीर विषयाची दखल घेत आमदार पिंपळे यांनी शासनाला त्वरित पुनर्वसनाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. जांभा (बु.) येथील ग्रामस्थांनी दिलेल्या विश्वासाचा मान राखण्यासाठी सरकारने विलंब न करता योग्य निर्णय घ्यावा, अशी त्यांची ठाम मागणी होती.

गावकऱ्यांनीही “न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील” असा निर्धार व्यक्त केला असून, शासनाचे आश्वासन प्रत्यक्षात उतरेपर्यंत त्यांचा लढा सुरूच राहणार आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!