Join WhatsApp group

बडनेरा-नाशिक रोड विशेष गाडीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Photo of author

By Sarkarmzanews

Share

२५ जून २५ : अकोला: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने काही विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अकोला मार्ग धावणाऱ्या बडनेरा ते नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या अनारक्षित दैनंदिन विशेष गाडीचा समावेश आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01211 बडनेरा – नाशिक रोड अनारक्षित दैनंदिन विशेष गाडी, जी यापूर्वी ३०.०६.२०२५ पर्यंत धावणार होती, तिला आता ०१.०७.२०२५ पासून ते ३०.०९.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या कालावधीत या गाडीच्या ९२ फेऱ्या होतील.त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक 01212 नाशिक रोड – बडनेरा जंक्शन अनारक्षित दैनंदिन विशेष गाडीलाही मुदतवाढ मिळाली आहे. ही गाडी यापूर्वी ३०.०६.२०२५ पर्यंत धावणार होती, परंतु आता ती ०१.०७.२०२५ पासून ३०.०९.२०२५ पर्यंत धावेल. या गाडीच्याही ९२ फेऱ्या होणार आहेत.

या मुदतवाढीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना त्यांच्या प्रवासाची योजना आखणे सोपे होईल. प्रवाशांनी या विस्तारित सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!