Join WhatsApp group

Ads

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता

By Sarkarmzanews

February 8, 2026 6:29 pm

Ads

मुंबई : दिनांक ०८ : गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ पारदर्शक, जलद आणि त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा, यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मान्यता दिली आहे.

अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी दिली.रश्मी आंबेडकर यांनी सांगितले की, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या सर्व अधिकृत एकविध क्रीडा संघटनांनी स्पर्धा संपल्यानंतर सात दिवसांच्या आत अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी तसेच गुणपत्रिका अभिलेख जतनासाठी क्रीडा संचालनालयाकडे ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ही माहिती संबंधित क्रीडा संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांनी डिजिटल स्वाक्षरीद्वारे प्रमाणित करणे आवश्यक राहणार आहे.

निर्धारित कालावधीत माहिती अपलोड न केल्यास संबंधित क्रीडा संघटनांचा डिफॉल्टर यादीत समावेश केला जाणार आहे.

तसेच खेळाडूंनी आपले ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे.

संघटना व खेळाडूंकडून अपलोड करण्यात आलेल्या माहितीची ऑनलाईन पद्धतीने पडताळणी केली जाणार आहे.

या नव्या प्रणालीमुळे खेळाडूंना पडताळणीसाठी विभागीय कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची किंवा कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही. परिणामी, ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक जलद व सुलभ पद्धतीने मिळण्यास मदत होणार आहे.

या प्रक्रियेसाठी खेळाडू व संबंधित क्रीडा संघटनांनी क्रीडा विभागास पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!