Join WhatsApp group

विधानसभा तालिका अध्यक्षांची व सभापतींची नियुक्ती जाहीर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुंबई, दि. ३ : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची घोषणा केली. विधानसभा सदस्य सर्वश्री योगेश सागर, संजय केळकर, बबनराव लोणीकर, रमेश बोरणारे, दिलीप बनकर, बापूसाहेब पठारे, सुनील राऊत आणि अमित झनक यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

तसेच विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभागृहात जाहीर केली.सभापती प्रा. शिंदे यांनी तालिका सभापती म्हणून सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, कृपाल तुमाने, अमोल मिटकरी, राजेश राठोड, सुनील शिंदे आणि श्रीमती चित्रा वाघ यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!