Join WhatsApp group

अवैध दारूविरोधात माना पोलिसांची आणखी एक यशस्वी कारवाई

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक : १३ ऑक्टोबर २५ : मुर्तिजापूर : अवैध दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चीत चांडक यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेअंतर्गत माना पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीस पकडण्यात यश मिळवले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी ग्राम जितापूर–खेडकर रस्त्यावर सापळा रचण्यात आला होता. या दरम्यान मोटरसायकलवरून देशी दारूची अवैध वाहतूक करणारा उमेश सुरेश गोंडाणे (वय ३५, रा. माना, ता. मूर्तिजापूर) हा पोलिसांच्या तावडीत सापडला.

त्याच्या ताब्यातून २०० नग देशी दारू ‘बॉबी संत्रा’ (९० मि.ली.), एक व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन, आणि मोटरसायकल असा एकूण ₹१ लाख ६ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध कलम ६५(ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चीत चांडक, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बदेली चंद्रकांत रेड्डी, आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सौ. वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत ठाणेदार गणेश नावकार, पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हवालदार उमेश हरमकर, आणि पोलीस शिपाई प्रमोद हिवराळे यांचा मोलाचा सहभाग होता.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!