Join WhatsApp group

अमरनाथ यात्रेकरूंचे राजराजेश्वर नगरीत उत्साही स्वागत

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक ३० जून २५ : अकोला : भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरलेले अमरनाथ यात्रेचे प्रेरणादायी दृश्य राजराजेश्वर नगरीत पाहायला मिळाले. ऑपरेशन शेंदूर नंतर पहिल्यांदाच 40 भक्तांचा जथ्था अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाला. या जथ्थ्याचे उत्साही स्वागत भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमात भाजप महिला आघाडीच्या नेत्या सौ. सुहासिनी धोत्रे यांनी सांगितले की, “40 वर्षांपासून वेगवेगळ्या समाजातील नागरिकांना एकत्र करून यात्रा घडवणारे प्रदीप खडके यांचे कार्य हे खरोखरच पुण्याचे आहे.”

विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात मंचावर महानगराध्यक्ष जयंत मसणे, गंगादेवी गोवर्धन शर्मा, मंजुषा सावरकर, चंदा शर्मा, वर्षा मेहता, माधव मानकर, देवाशिष काकड, गिरीश जोशी, गीतांजली शेगोकार आदी मान्यवर उपस्थित होते.

यात्रेकरूंना औषधी रेनकोट, फराळाचे किट आणि दुपट्टा-नारळ देऊन सन्मानित करण्यात आले. या किटमध्ये 40 जणांसाठी विशेष पूजन साहित्य व प्रवास उपयोगी वस्तूंचा समावेश करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश जोशी, सूत्रसंचालन अर्चना शर्मा, आणि आभारप्रदर्शन माधव मानकर यांनी केले. यावेळी किशोर पाटीलजयंत मसणे यांची भाषणेही झाली.

कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवर:

  • सुहासिनी धोत्रे
  • गंगा शर्मा
  • मंजुषा सावरकर
  • समीक्षा धोत्रे
  • पुष्पा खंडेलवाल
  • महापौर अर्चना मसणे
  • गीतांजली शेगोकार
  • वैशाली शेळके
  • सुमन गावंडे
  • सारिका जयस्वाल
  • रंजना विंचनकर
  • जानवी डोंगरे
  • साधना येवले

राजकीय नेतृत्व:
खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, माजी महापौर विजय अग्रवाल, महानगर अध्यक्ष जयंत मसणे यांचे नेतृत्व लाभले.

कार्यक्रमासाठी माधव मानकर, गिरीश जोशी, संजय गोटफोडे, ऍड. देवाशिष काकड, रमेश अलकरी, अमोल गीते, संतोष डोंगरे, डॉ. संजय शर्मा, किशोर कुचके यांसह अनेकांनी मेहनत घेतली.

यात्रेकरूंची नावे:
प्रदीप खडके, दुर्गा खडके, नारायण अवचार, ज्ञानेश्वर अभंग, संदीप कटारे, अमोल देशमुख, यश कटारे, रेखा कटारे, अनुजा ताथोड, वंदना शिंदे, अविनाश अंकुशकर, जयश्री अंकुशकर, डॉ. गणेश मेहेरे, चंद्रकांत शर्मा, सरिता डांगे, मंगेश खडके, नरेंद्र जकाती, पंकज धांडे, प्रियंका ढोले, आशिष ढोले, जया महल्ले, रवींद्र महाले आदी ४० भक्तांचा सन्मान करण्यात आला.

— ही यात्रा ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून, समाज एकत्र आणणारी, प्रेरणा देणारी, आणि संस्कृतीचे जतन करणारी परंपरा ठरत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!