Join WhatsApp group

Ads

शासकीय दुखवट्यात ७५ शाळांना अल्पसंख्याक प्रमाणपत्रे प्रदान केल्याचा आरोप निराधार

By Sarkar Maza

February 24, 2026 9:02 am

Ads

मुंबई, दि. २४ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी (दि.२८ जानेवारी २०२६ रोजी) अल्पसंख्याक विकास विभागामार्फत कोणत्याही नवीन फाईल्सवर किंवा प्रमाणपत्रांवर डिजिटल स्वाक्षरी करण्यात आलेली नाही, असा खुलासा अल्पसंख्याक विकास विभागाने केला आहे. तसेच त्या दिवशी कोणतेही प्रमाणपत्र वाटप झालेले नसल्याचेही विभागाने नमूद केले आहे.

अल्पसंख्याक दर्जा प्रदान करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन, पारदर्शक असून २७ मे २०१३ च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसारच राबवली जाते. अर्जांची जिल्हास्तरावर पडताळणी झाल्यानंतरच छाननी करून प्रमाणपत्रे वितरित केली जातात, असे विभागाने नमूद केले आहे. विभागामार्फत कोणतेही अनधिकृत अथवा घाईघाईने कामकाज झाल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असून वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे असल्याचा ठाम दावा अल्पसंख्याक विकास विभागाने केला आहे.

‘लोकसेवा हक्क अधिनियम २०१५’ अंतर्गत ठरविण्यात आलेल्या कालमर्यादेचा विचार करून, विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत विहीत कार्यपद्धतीनुसार आदेश देण्याची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करण्यात आली होती, असेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

दि. २७ मे २०१३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी उपसचिव श्री. शेणॉय यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावास विभागाचे मंत्री यांनी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी मान्यता दिली होती. त्यामुळे स्थगिती असताना सेवा प्रदान करण्यात आली, हा आरोप तथ्यहीन असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

Related Article

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार मूर्तिजापूर मतदान केंद्रावर ९५.७३ टक्के मतदान; महिला मतदारांचा सहभाग ९६.६४ टक्के

वसंत देसाई स्टेडियममधील संशयास्पद इंजेक्शन प्रकरणावर क्रीडा विभागाचा खुलासा

शामोंडा विषाणूचा पहिला मानवी संसर्ग; फ्रान्समध्ये रुग्णाचा मृत्यू!

“६ मीटरची मर्यादा भेदून ३० मीटरपर्यंत उत्खनन?”“खाण-क्रशर संघटनेचाच गंभीर आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून खदानींच्या तपासणीचे आदेश”

“पोटदुखीने रुग्णालयात गेली अन् धक्कादायक सत्य समोर; १८ वर्षीय तरुणी गर्भवती, दहावीतील मुलाविरोधात गुन्हा”

पिंजरमध्ये कथित जुगाराचा बाजार; तक्रारीनंतरही कारवाईचा पत्ता नाही!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!