Join WhatsApp group

श्री नरसिंग विद्यालय च्या खेळाडू तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विजयी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

आकोट प्रतिनिधी : क्रीडा व युवकसेवा संचलनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या द्वारे तालुका क्रीडा संकुल आकोट येथे दिनांक १ ऑक्टोबर ला पार पडलेल्या आकोट तालुका स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत श्री नरसिंग विद्यालय आकोट च्या मुलींनी सुयश मिळवले.

१४ वर्षे वयोगटात मनस्वी गावंडे, वर्ग ७ वा (८० मी. अडथळा), १७ वर्षे वयोगटात साक्षी वानखडे वर्ग १० वा (उंच उडी) , विशाखा तेलगोटे वर्ग १० वा (१५०० मी. धावणे) , श्रृती वाघ वर्ग १० वा (३ किमी चालणे), विशाखा तेलगोटे वर्ग १० वा (१०० मी. अडथळा) आणि ‍१९ वर्षे वयोगटात भावना धुंदे वर्ग १२ वा (३ किमी चालणे), किर्ती कुकडे वर्ग १२ वा (१०० मी. अडथळा), अनुष्का पवार वर्ग १२ वा (क्रॉसकंट्री) यांनी आपआपल्या बाबींमधे विजय मिळवून जिल्हा स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

या सर्व खेळाडू आता अकोला जिल्हा स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत आकोट तालुक्याचे प्रतिनिधित्व करतील. या सर्व विजयी खेळाडूंचे शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश जोशी, पर्यवेक्षक श्री मिलींद देवळे व शिक्षकांनी अभीनंदन केले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!