Join Whatsapp

जिल्हास्तरीय शालेय टेनिकोईट स्पर्धेला सुरुवात.

Photo of author

By Sir

Share

क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद अकोला व अकोला जिल्हा टेनिकोईट संघटना अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय टेनिकोईट स्पर्धेचे आयोजन राजेश्वर कॉन्व्हेंट गोडबोले प्लॉट येथे करण्यात आले. या स्पर्धेत 14,17,19 वर्ष मुले व मुली मनपा क्षेत्र व ग्रामीण क्षेत्रातील शाळाचे स्पर्धा घेण्यात येत आहेत. सदर स्पर्धेस उदघाटक म्हणून राजेश्वर कॉन्व्हेंट चे संचालिका श्रीमती पटोकार मॅडम होते तर अध्यक्ष स्थानी राजेश्वर कॉन्व्हेंटचे सचिव श्री वैभव मेहरे होते.स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून बेसबॉल/सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव नारायण बत्तूले,जिल्हा टेनिकोईट संघटनेचे सचिव ज्ञानेश टाले, राजेश्वर कॉन्व्हेंट चे मुख्याध्यापिका श्रीमती वरणकार, श्री. तौकीर खान हे होते.स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
14 वर्ष मुल जिल्हा :-
प्रथम :- सरला राम काकानी मुर्तिजापूर
द्वितीय :- परशुराम नाईक विद्यालय बोरगाव
तृतीय:- समर्थ पब्लिक स्कूल रिधोरा

14 वर्ष मुली ग्रामीण :
प्रथम:- सरला राम काकानी मुर्तिजापूर
व्दितीय:- परशुराम नाईक विद्यालय बोरगाव
तृतीय :- बाबासाहेब धाबेकर विद्यालय बाळशीटाकळी
व्दितीय:- परशुराम नाईक विद्यालय बोरगाव
तृतीय :- बाबासाहेब धाबेकर विद्यालय बाळशीटाकळी
17 वर्ष मुल म. न. पा.
प्रथम :- सन्मित्र पब्लिक स्कूल अकोला
द्वितीय :- इमराल्ड हाइट्स स्कूल अकोल
तृतीय:- नोएल सी बी एस सी स्कूल अकोला

17 मुली मुली म. न. पा.
प्रथम:- शंकरलाल रामदेवजी अग्रवाल हाय स्कूल अकोला
व्दितीय:- सन्मित्र पब्लीक स्कूल अकोला
तृतीय:- इमराल्ड हाइट्स स्कूल अकोला.
स्पर्धेत पंच म्हणून मनीष अलगुलवार, आशुतोष दुबे, अभिजित गोमासे, अमित मनवर, नितेश वासनिक, पंकज गाढे, तौसिफ़ शेख यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मा. जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटक राजेश गावंडे, क्रीडा अधिकारी मनीषा ठाकरे, राक्रीमा सुरजकुमार दुबे,राक्रीमा अमर जाधव, राक्रीमा नलिनी जाधव, निशांत वानखडे परिश्रम घेत आहेत. असे जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट कळवितात.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!