Join WhatsApp group

अकोला – वंदे भारत एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – अकोल्यात नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या आगमनावेळी उत्साहपूर्ण आणि ऐतिहासिक स्वागत करण्यात आले. या गाडीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले असून, ही देशातील 150 वी वंदे भारत गाडी आहे. जलद गती, प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि ‘स्वदेशी’ मंत्राचा प्रचार यामुळे ही गाडी आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.

रेल्वे स्टेशनवर आयोजित कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ शिवरकर, वसंत बाचोका, विजय अग्रवाल, किशोर पाटील, उमेश मालू, मिश्रा विमल जैन शर्मा, सुभाषसिंह ठाकूर, कृष्णा शर्मा, माधव मानकर, गिरीश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

तिकीट खिडकी समोर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पाच शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. विजेत्यांना पारितोषिके तसेच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवासासाठी मोफत पास देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमाअंतर्गत समाजातील विविध घटकांनाही मोफत पास देण्यात आले.

स्वागत सोहळा जल्लोषमय

रेल्वे स्टेशनवर गाडीचे आगमन होताच पुष्पवृष्टी, ढोल–ताशांचा गजर, मिठाई वाटप, घोषणाबाजी आणि आतषबाजीने परिसर दुमदुमला. “भारत माता की जय”, “जय श्रीराम”, “हर हर महादेव”, “धन्यवाद मोदीजी” अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.

16 बोगींच्या गाडीचे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले.या सोहळ्यात 5000 पेक्षा अधिक भाजप कार्यकर्ते, जिल्हाभरातील विविध आघाड्यांचे प्रतिनिधी, व्यापारी, उद्योजक, शिक्षकवर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पाठपुराव्यामुळे अकोल्याला व शेगावला गाडीचा थांबा मिळाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!