Join WhatsApp group

अकोला पोलिसांची धडाकेबाज कारवाई : सुफियान हत्या प्रकरणातील आरोपीची धिंड काढून समाजासमोर दाखवला आरसा!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : दिनांक ०४ सप्टेंबर २५:

जिल्हा हादरवून टाकणाऱ्या सुफियान हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडल्यानंतर अकोला पोलिसांनी धाडसी पाऊल उचलत आज शिवनी परिसरात त्याची धिंड काढली.राहत्या घरापासून गल्लीबोळापर्यंत पोलिसांनी आरोपीला जाहीरपणे फिरवले. गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कायद्याच्या पंजातून सुटू शकत नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला.

धिंडीदरम्यान नागरिकांचा प्रचंड जमाव जमा झाला होता. परिसर दणाणून सोडणारे घोषवाक्ये घुमत होते – “पोलिसांचा विजय असो”, “खुन्यांना फाशी द्या”, “सुफियानला न्याय मिळालाच पाहिजे”. महिलांनी घराच्या गॅलरीतून आरोपीवर संतापाचा वर्षाव केला, काहींनी तोंडी धारेवर धरले.

ही कारवाई पाहून लोकांच्या अंगावर काटा आला. खुन्यासाठी गावात जागा नाही, असेच चित्र धिंडीदरम्यान दिसले. आरोपीला पाहताच लोकांनी शिव्या-शाप दिले. पोलिसांचा कायद्याचा धाक सर्वांच्या मनावर ठसला.

गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि समाजात कायद्याबद्दल आदर निर्माण व्हावा म्हणून पोलिसांनी उचललेले हे पाऊल ऐतिहासिक ठरले आहे. अकोला जिल्ह्यात अशा प्रकारे आरोपीची धिंड काढणे व समाजाला मधील जनतेला त्यांचा खरा चेहरा दाखवण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सुफियान हत्येच्या या भीषण प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या प्रकरणाबाबत बोलताना अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले की, “सूफियान हत्या प्रकरण अत्यंत गंभीर असून समाज हादरून गेला आहे. आरोपींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. तपास जलदगतीने सुरू असून कायदेशीर मार्गाने त्यांना कडक शिक्षा होईल. न्याय मिळेपर्यंत अकोला पोलिस शांत बसणार नाहीत.”


Share

Leave a Comment

error: Content is protected !!