Join WhatsApp group

वेश्या व्यवसायावर अकोला पोलिसांचा छापा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला (दि. २२ जुलै २५) – अकोल्यातील उच्चभ्रू वस्ती कीर्ती नगर मधील एका आलिशान घरात बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी धडक कारवाई करत रॅकेट उद्ध्वस्त केले.

ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक तयार केले.

खात्रीसाठी बनावट ग्राहक पाठवण्यात आला. ग्राहकाकडून पैसे घेऊन महिलांची उपलब्धता असल्याची ठोस माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपी जयेश नरेश अग्रवालसह पाच ग्राहक आणि चार महिलांना ताब्यात घेतले. आरोपींकडून दोन दुचाकी, मोबाईल फोनसह एकूण २ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तिन्ही मुख्य आरोपींविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, आर्थिक अडचणीमुळे अनेक महिला या व्यवसायात ओढल्या जात आहेत आणि त्यांचा फायदा घेऊन काहीजण त्यांना कमिशनवर ग्राहक व जागा पुरवतात.

ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पीएसआय दीपक पवित्रकर, महिला पीएसआय मयुरी सावंत, दादाहरी वनवे, नीलेश खंडारे, अमित दुबे, विजय मुलाणकर, दिनकर धुरंधर, रवी काटकर, अभिवचन अरविंद, अरविंद बोरकर, कांबळे यांच्या पथकाने केली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!